रो हाऊसमध्ये घुसून साडेसहा लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांसहित रोकडही लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 15:49 IST2021-07-07T15:49:28+5:302021-07-07T15:49:35+5:30
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल, दत्तगडनगर दिघी येथे १८ जूनला ही घटना उघडकीस आली

रो हाऊसमध्ये घुसून साडेसहा लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांसहित रोकडही लंपास
पिंपरी: अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजातून प्रवेश करत ६ लाख ४४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली आहे. दत्तगडनगर दिघी येथे १८ जूनला ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी मंगळवारी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्तात्रय निवृत्ती लोखंडे (वय ६०, रा. दत्तगडनगर, दिघी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोखंडे यांचे दत्तगडनगर येथे रो हाऊस आहे. १४ एप्रिल ते १८ जून या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या रो हाऊस मध्ये प्रवेश केला. घरातून १५२ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६ लाख ४४ हजार १९१ रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.