शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

हॉकर्स झोन नसल्याने पथारीवाल्यांचा रस्त्यावर ठिय्या

By admin | Updated: June 23, 2016 02:03 IST

भोसरी विधानसभा मतदारसंघातील अतिशय महत्त्वाचा म्हणून भोसरी गावठाण प्रभागाचा नावलौकिक आहे. जुने संपूर्ण भोसरी गाव या प्रभागात येत आहे

भोसरी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील अतिशय महत्त्वाचा म्हणून भोसरी गावठाण प्रभागाचा नावलौकिक आहे. जुने संपूर्ण भोसरी गाव या प्रभागात येत आहे. भोसरी व परिसरातील राजकारण व समाजकारण कायम या प्रभागाभोवती फिरत असते, म्हटले तर वावगे ठरणार नाही. सध्या या प्रभागात प्रत्येक रस्त्यावर, पदपथावर पथारीवाल्यांनी ठाण मांडले आहे. अग्निशामक केंद्र ते चांदणी चौक व चांदणी चौकापासून नाशिक रस्त्याने धावडे वस्तीपर्यंत पथारीवाले, चारआसनी रिक्षा व फळे व भाजीपाला विक्रेत्यांचा विळखा पडला आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळेस नागरिकांना चालत जाणेही मुश्कील होऊन बसले आहे. स्थानिक नगरसेवक हॉकर्स झोनसाठी मागणी करत आहेत. मात्र, हॉकर्स झोन होत नसल्याने नगरसेवक व पदाधिकारी हतबल झाले असून, या ठिकाणी हॉकर्स झोन झाल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. मात्र, भोसरीतील कारभारी या प्रकाराकडे गांभीर्याने पाहणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.गेल्या चार वर्षांपासून या प्रभागात मोठं मोठी विकासकामे झाली आहेत. काही सुरूही आहेत. मात्र, भोसरीच्या रस्त्यावरून जाताना नागरिकांचा श्वास गुदमरल्याशिवाय राहत नाही. यशवंतराव स्मृती रुग्णालयानंतर असणारे सर्वांत मोठे शंभर खाटांचे रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहरातील एकमेव असे मॅटवरील कुस्ती प्रशिक्षण येथील सर्व्हे क्रमांक एक या ठिकाणी होत आहे. अद्ययावत अशी भाजी मंडई उभी राहत आहे. त्यामुळे या प्रभागाबरोबर भोसरीचा नावलौकिक वाढणार आहे. या प्रभागात नागरिकांना विजेच्या लपंडावाचा कायम सामना करावा लागत असे. यासाठी नगरसेवकांनी पाठपुरावा करून सहा ठिकाणी ट्रान्स्फॉर्मर बसवून घेतले. त्यामुळे लाइट जाण्याच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. मात्र, त्या पूर्णपणे बंद झालेल्या नाहीत. महावितरणने अजूनही सर्व लोड ट्रान्सफर केला नसल्याची माहिती विद्युत विभागाकडून देण्यात आली आहे. (वार्ताहर)