Pimpri - Chinchwad: माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, अन्यथा बदनामी करेन; तरुणीला दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 03:57 PM2022-01-27T15:57:49+5:302022-01-27T15:58:10+5:30

आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Have sexual relations with me or I will slander you Threatened the young woman in pimpri | Pimpri - Chinchwad: माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, अन्यथा बदनामी करेन; तरुणीला दिली धमकी

Pimpri - Chinchwad: माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, अन्यथा बदनामी करेन; तरुणीला दिली धमकी

googlenewsNext

पिंपरी : मैत्री करून शारीरिक संबंध ठेव, अन्यथा फोटो सोशल मीडियावर टाकीन, अशी धमकी देऊन एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. ही घटना रविवारी (दि. २३) भाजी मार्केटजवळ, म्हाळुंगे येथे दुपारी चार वाजता घडली. या प्रकरणी एका २७ वर्षे महिलेने फिर्याद दिली आहे. नूर पीर मोहम्मद (वय २३, रा. वरळे रोड, म्हाळंगे, मूळ राहणार लोटाढ , ता मेजारोड, जिल्हा इलाहाबाद, उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादीच्या घरी जाऊन माझ्याशी मैत्री कर आणि शारीरिक संबंध ठेव, नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियावर टाकून तुझी बदनामी करेन अशी धमकी दिली. तसेच महिलेचा हात पकडून मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यामुळे आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Have sexual relations with me or I will slander you Threatened the young woman in pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.