Pimpri - Chinchwad: माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, अन्यथा बदनामी करेन; तरुणीला दिली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 15:58 IST2022-01-27T15:57:49+5:302022-01-27T15:58:10+5:30
आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Pimpri - Chinchwad: माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, अन्यथा बदनामी करेन; तरुणीला दिली धमकी
पिंपरी : मैत्री करून शारीरिक संबंध ठेव, अन्यथा फोटो सोशल मीडियावर टाकीन, अशी धमकी देऊन एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. ही घटना रविवारी (दि. २३) भाजी मार्केटजवळ, म्हाळुंगे येथे दुपारी चार वाजता घडली. या प्रकरणी एका २७ वर्षे महिलेने फिर्याद दिली आहे. नूर पीर मोहम्मद (वय २३, रा. वरळे रोड, म्हाळंगे, मूळ राहणार लोटाढ , ता मेजारोड, जिल्हा इलाहाबाद, उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादीच्या घरी जाऊन माझ्याशी मैत्री कर आणि शारीरिक संबंध ठेव, नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियावर टाकून तुझी बदनामी करेन अशी धमकी दिली. तसेच महिलेचा हात पकडून मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यामुळे आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.