स्वयंपाक करता येत नसल्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 17:28 IST2019-01-09T17:25:04+5:302019-01-09T17:28:27+5:30

विवाहीतेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

harresment of a women in bhosari | स्वयंपाक करता येत नसल्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ

स्वयंपाक करता येत नसल्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ

पिंपरी : स्वयंपाक नीट करता येत नाही, लग्नात मानपान केला नाही, यासह फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून ११ लाख रुपये आणावेत या कारणावरुन विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पती कुणाल कमलाकर क्षीरसागर (वय ३२), सासरे कमलाकर गंगाधर क्षीरसागर (वय ५५), सासू विनोदीनी क्षीरसागर (वय ५०), दीर विशाल क्षीरसागर (वय २८), नणंद करिष्मा धिरज चौरे (वय २७, सर्व रा. गणेशनगर, पिंपरी-चिंचवड महापालिका वसाहत, दापोडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी २७ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवाहिता सासरी नांदत असताना लग्नात मानपान केला नाही, स्वयंपाक नीट करता येत नाही यावरुन सासरच्या मंडळींनी विवाहितेला मानसिक त्रास दिला. यासह फ्लॅट घेण्यासाठी आई-वडीलांकडून ११ लाख रुपये घेवून येण्याची मागणी करीत इतरही वेगवेगळया कारणावरुन विवाहितेला मारहाण केली. तसेच विवाहितेकडील मंगळसूत्र व इतर दागिने काढून घेतले. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: harresment of a women in bhosari