भोसरीत व्हाट्सअपवर बदनामी करणारे स्टेटस ठेवून महिलेचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 17:10 IST2022-05-28T17:10:00+5:302022-05-28T17:10:01+5:30
तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल...

भोसरीत व्हाट्सअपवर बदनामी करणारे स्टेटस ठेवून महिलेचा विनयभंग
पिंपरी : शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करून प्रेम संबंधांसाठी आग्रह केला. तसेच व्हाट्सअपवर बदनामी करणारे स्टेटस ठेवून महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दिघी रोड भोसरी येथे २० मार्च ते २६ मे या कालावधीत ही घटना घडली.
पीडित महिलेने या प्रकरणी शुक्रवारी (दि. २७) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अभिलाश राऊत (वय २९, रा. अमरावती) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला नको असतानाही आरोपीने शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली.
फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर सतत फोन करून पाटला केला तसेच प्रेम संबंध ठेवण्यासाठी आग्रह केला. आरोपीने त्याच्या व्हाट्सअपवर फिर्यादी महिलेची बदनामी करणारे स्टेटस ठेवून फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे तपास करीत आहेत.