पुणे : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने रिक्षाचालकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 16:30 IST2022-04-23T16:30:00+5:302022-04-23T16:30:01+5:30

पिंपरी : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने रिक्षाचालकाने अश्लील कृत्य करून १२ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. बावधन येथे शुक्रवारी दुपारी सव्वा ...

harassment of a minor girl under the pretext of asking for an address bavdhan | पुणे : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने रिक्षाचालकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पुणे : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने रिक्षाचालकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पिंपरी : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने रिक्षाचालकाने अश्लील कृत्य करून १२ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. बावधन येथे शुक्रवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास ही घटना घडली. 

पीडित १२ वर्षीय मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. २२) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एका अनोळखी रिक्षाचालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची १२ वर्षीय मुलगी खाजगी अभ्यासिकेतून अभ्यास करून येत असताना रस्त्याच्या विरुद्ध बाजूला अनोळखी रिक्षाचालक आला. पत्ता विचारण्याचा बहाणा करून त्याने अश्लील कृत्य करून तसेच अश्लील हावभाव करून फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.

Web Title: harassment of a minor girl under the pretext of asking for an address bavdhan