लोणावळ्यातील न्यु तुंगार्लीत पत्नीवर कोयत्याने खुनी हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 15:40 IST2020-01-07T15:35:44+5:302020-01-07T15:40:05+5:30

घटनास्थळावरुन कोयत्यासह आरोपी त‍ाब्यात

half murdered attack on wife in New Tungarli at Lonavla | लोणावळ्यातील न्यु तुंगार्लीत पत्नीवर कोयत्याने खुनी हल्ला

लोणावळ्यातील न्यु तुंगार्लीत पत्नीवर कोयत्याने खुनी हल्ला

ठळक मुद्देमारहाण करत असल्याने लग्नानंतर साधारण दिड वर्षापासून ते विभक्त

लोणावळा : सासरवाडीत जाऊन पत्नीवर कोयत्याने हल्ला करत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार आज सकाळी साडेदहा लोणावळ्यात घडला. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी आरोपी राजाराम साहेबराव जाधव (रा. कशाळभोईरे , ता. मावळ, जि. पुणे) यासह घटनास्थळावरुन कोयत्यासह त‍ाब्यात घेत अटक केली. जाधव यांची सासू सखुबाई गबळू लंके (वय 65, रा. न्यु तुंगार्ली, लोणावळा) यांनी फिर्याद दिली आहे.
    लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी राजाराम जाधव व फिर्यादी यांची मुलगी अनिता याचे 25 वर्षापुर्वी लग्न झाले आहे. लग्न झाल्यापासून जाधव हा बायकोला मारहाण करत असल्याने लग्नानंतर साधारण दिड वर्षापासून ती माहेरी निघून आली. तेव्हापासून ते विभक्त रहात आहेत. असे असले तरी राजाराम जाधव हा सासरवाडीत येऊन अनिता यांना शिविगाळ व मारहाण करायचा. आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास राजाराम जाधव हा हातात कोयता घेऊन सखुबाई व अनिता माळीकाम करत असलेल्या बंगल्यात गेटवरुन उडी मारुन घुसला, त्याने प्रथम सासू वर व नंतर अनितावर जिवघेणा हल्ला केला. त्याने अनिताच्या चेहर्‍यावर व हातावर सपासप वार करत तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. राजाराम हा सासू सखूबाई व मुलगी सुषमा यांना देखिल पुढे आलात तर खल्लास करेल असे म्हणत होता हा सर्व प्रकार फिर्यादी यांचा मुलगा रामचंद्र लंके याने लोणावळा शहर पोलीसांना कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल कसबेकर, पंढरीनाथ कामठे, बंटी कवडे, भरत मोरे हे सरकारी गाडीतून तर वाहतुक हवालदार विजय जांभळे व रविंद्र सरसे हे दुचाकीवरुन अवघ्या पाच मिनिटात घटनास्थळावर पोहचले व त्यांनी आरोपी राजाराम याच्या तावडीतून सखूबाई व सुष्मा यांची सुटका केली तर रुग्णवाहिकेची वाट न पाहता पोलीस जीपमधून अनिता यांना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी तपास करत आहेत.

Web Title: half murdered attack on wife in New Tungarli at Lonavla