शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाने झुगारला राजकीय दबाव

By admin | Updated: April 15, 2017 03:58 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेत काम करणारे आणि पदाधिका-यांशी जवळीक असलेल्या काही पीसीएमटीच्या कर्मचाऱ्यांना पीएमपीत वर्ग करू नये, म्हणून भाजपाच्या

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत काम करणारे आणि पदाधिका-यांशी जवळीक असलेल्या काही पीसीएमटीच्या कर्मचाऱ्यांना पीएमपीत वर्ग करू नये, म्हणून भाजपाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महापालिका आणि पीएमपी प्रशासनावर दबाव टाकला. मात्र, पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना हा दबाव झुगारला. त्यामुळे महापालिकेतील वशिलेबाज कर्मचा-यांना नोकरी टिकविण्यासाठी अखेरीस पीएमपीमध्ये रुजू व्हावे लागले.पिंपरी-चिंचवड महापालिकेत काम करणारे पीसीएमटीचे १७८ कर्मचारी पीएमपीमध्ये पुन्हा रुजू करण्यात यावे, असे पत्र तुकाराम मुंढे यांनी दिले होते. त्यावर महापालिकेतील कर्मचारी पुन्हा पीएमपीकडे वर्ग करण्यास शहरातील पदाधिकाऱ्यांनी विरोध करीत राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. यापूर्वी पीसीएमटीकडील अतिरिक्त ठरणारे कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या विविध विभागांमध्ये पीसीएमटीकडून वर्ग केले होते. या कर्मचाऱ्यांची पीएमपीला नितांत गरज असल्याने त्यांना वर्ग करण्यात यावे, अशी अनेक दिवसांची मागणी होती. मात्र, त्यावर कार्यवाही करण्यात येत नव्हती. दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी पिंपरी महापालिकेला त्याविषयी थेट पत्र दिले. तसेच दोन दिवसांत कर्मचाऱ्यांनी पीएमपीमध्ये रुजू व्हावे, असेही त्यांनी नमूद केले होते. (प्रतिनिधी)संभ्रम : भाजपाच्या एका गटाचा विरोधमहापालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परत पीएमपीएमएलकडे देण्यास महापौर नितीन काळजे यांनी विरोध दर्शविला होता. आयुक्तांशीही चर्चा केली होती. मात्र, आयुक्तांनी रुजू होण्याचे आदेश दिल्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली होती. या कामगारांना ठेवायचे की पुन्हा पीएमपीत पाठवायचे याबाबत भाजपात दोन गट झाले होते. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही तुकाराम मुंढे यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न देखील झाला. मात्र, महापालिका आयुक्त किंवा मुंढे राजकीय दबावापुढे झुकले नाहीत. निलंबनाच्या भीतीने कामावर रुजूपीएमपीएमएलमध्ये रुजू न झाल्यास योग्य ती कारवाई करण्याचा इशारा मुंढे यांनी दिला होता. गुरुवारी सकाळपर्यंत कामगारांनी राजकीय नेत्यांच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रयत्न अयशस्वी ठरल्याने महापालिका प्रशासनाने हात वर केल्याने अखेरीस निलंबनाची कारवाई होऊन नोकरी जाऊ शकते या भीतीने महापालिकेतील कर्मचारी पीएमपीएमएलमध्ये रुजू झाले आहेत.