टोळक्याकडून तरुणांवर प्राणघातक हल्ला ; घटना सीसीटिव्हीमध्ये कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 20:48 IST2019-05-05T20:46:03+5:302019-05-05T20:48:52+5:30

रस्त्यावर गप्पा मारत उभ्या असलेल्या तरुणांना आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने हॉकी स्टिकने बेदम मारहाण करीत कोयत्याने वार केले. ही घटना शनिवारी रात्री थेरगाव येथे घडली.

goon beaten up youth in thergaon ; incident capture in cctv cameras | टोळक्याकडून तरुणांवर प्राणघातक हल्ला ; घटना सीसीटिव्हीमध्ये कैद

टोळक्याकडून तरुणांवर प्राणघातक हल्ला ; घटना सीसीटिव्हीमध्ये कैद

पिंपरी : रस्त्यावर गप्पा मारत उभ्या असलेल्या तरुणांना आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने हॉकी स्टिकने बेदम मारहाण करीत कोयत्याने वार केले. ही घटना शनिवारी रात्री थेरगाव येथे घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

या घटनेत इंद्रजित माने व अजय हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जखमी इंद्रजित माने, अजय व त्यांचे मित्र थेरगाव फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला गप्पा मारत थांबले होते. दरम्यान, तीन दुचाकींवरुन हातात हॉकी स्टिक आणि कोयते घेऊन आलेल्या अनोळखी व्यक्तींनी त्यांना मारहाण करत वार करण्यास सुरुवात केली. सर्व मित्र सैरा वैरा धावत सुटले. 

दरम्यान, येथील एका किराणा दुकानाजवळ अजय हे टोळक्याच्या तावडीत सापडले. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार केले. त्याचवेळी इंद्रजित यांना टोळक्यातील एकजण मारत असताना त्याला वाचवण्याच्या उद्देशाने अजय यांनी पुढे हात केला असता अजय यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. मारहाण झाल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत. 
 

Web Title: goon beaten up youth in thergaon ; incident capture in cctv cameras