किरकोळ वादातून रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 19:38 IST2019-08-01T19:36:12+5:302019-08-01T19:38:08+5:30

दाेन दुचाकीस्वारांमध्ये झालेल्या वादातून एकाने थेट रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची ताेडफाेड केली.

glass of four wheeler's broke due to conflicts between two | किरकोळ वादातून रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड

किरकोळ वादातून रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड

पिंपरी : दोन दुचाकीस्वारांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एकाने हौसिंग सोसायटीच्या बाहेर रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. पिंपळे गुरव येथे गुरुवारी (दि. १) पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील कल्पतरू हौसिंग सोसायटी समोरील रस्त्यावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांमध्ये वाद झाला. त्याचा राग आल्याने यातील एका दुचाकीस्वाराने सोसायटी समोरील रस्त्यावर पार्क केलेल्या पाच वाहनांची त्याने रात्री अडीचच्या सुमारास तोडफोड केली. गाड्यांच्या समोरील आणि पाठीमागच्या काचा फोडल्या. याबाबत सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने रहिवाशांना याबाबत माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाहन तोडफोडीचा प्रकार कैद झाला आहे. त्यावरून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: glass of four wheeler's broke due to conflicts between two