शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडच्या सुरक्षेसाठी नागरिकांना देणार बंदूक परवाना : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 12:03 IST

माझे शहर, माझी सुरक्षा, माझी जबाबदारी, या अनुषंगाने गस्तीसाठी थेट नागरिकांचे सहकार्य घेण्यात येणार

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय नवीन असल्याने मनुष्यबळाची समस्याशहरात मोहल्ला सुरक्षा दल तसेच ग्रामीण भागात ग्राम सुरक्षा दल म्हणून हे पथक कार्यरत राहणार

नारायण बडगुजर-पिंपरी : उद्योगनगरीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडून उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात नागरिकांचा सहभाग करून घेण्यावर भर देण्यात येत आहे. माझे शहर, माझी सुरक्षा, माझी जबाबदारी, या अनुषंगाने गस्तीसाठी थेट नागरिकांचे सहकार्य घेण्यात येणार असून, त्यासाठी नागरिकांना बंदुकीचे परवाने देण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली. 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय नवीन असल्याने मनुष्यबळाची समस्या आहे. अधिकारी व कर्मचारी पुरेशा संख्येने उपलब्ध होत नसल्याने पोलिसांवर कामाचा ताण आहे. असे असतानाच शहरात ज्वेलर्सची दुकाने फोडून चोरी, घरफोडी, जबरी चोरी, वाहनचोरी, एटीएम फोडणे, सोनसाखळी चोरी आदी गुन्हे सातत्याने घडत आहेत. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्रगस्तीवर पोलिसांकडून भर दिला जात आहे. मात्र मनुष्यबळ कमी असल्याने त्यावर मर्यादा येत आहेत. त्यासाठी शहरवासीयांची मदत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

शहरातील विशिष्ट भागात किंवा परिसरात चोरी आदी गुन्हे घडतात. अशा परिसरातील नागरिकांना बंदुकीचे परवाने पोलिसांकडून देण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुक नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. ज्या नागरिकांवर गुन्हे दाखल नाहीत, तसेच आठवड्यातून एकदा रात्रगस्त घालण्याची तयारी असलेल्या नागरिकांना अर्ज करता येईल. तसेच संबंधित नागरिकाने बंदूक स्वत: खरेदी करणे आवश्यक राहणार आहे. एका भागात किंवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० ते २५ नागरिकांचा ग्रुप तयार केला जाईल. तसेच त्यांचा व्हाटसअप ग्रुप देखील राहील. संबंधित पोलीस ठाणे तसेच पोलीस नियंत्रण कक्षातील अधिकारी हा ग्रुप नियंत्रित करणार आहेत.

शहरातील असुरक्षित ठिकाणे किंवा जेथे सातत्याने गुन्हेगारी कृत्य घडते अशा ठिकाणी बंदूकधारी नागरिकांकडून गस्त घालण्यात येईल. एका रात्रीसाठी किमान दोन नागरिकांचे पथक गस्त घालू शकणार आहे. शहरात मोहल्ला सुरक्षा दल तसेच ग्रामीण भागात ग्राम सुरक्षा दल म्हणून हे पथक कार्यरत राहणार आहे, असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ‘लोकमत’ला सांगितले. नागरिकांनी सतर्क होण्याबरोबरच शहराच्या सुरक्षेसाठी पुढे आले पाहिजे. स्वत:सह आपला परिसर, शहर सुरक्षित रहावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांचा त्यात प्रत्यक्ष सहभाग करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच नागरिकांची गस्त पथके तयार केली जाणार आहेत.- कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसtheftचोरीThiefचोरCrime Newsगुन्हेगारीcommissionerआयुक्त