'दारु पार्टीला रुम दे नाहीतर मारून टाकीन', व्यावसायिकाला धमकी देण्याऱ्याविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 13:38 IST2022-08-09T13:37:44+5:302022-08-09T13:38:00+5:30

पिंपरी :  दारु पार्टी करण्यासाठी नवीन बांधकामात कायमची रुम दे, रुम नाही दिली तर तुला मारून टाकीन, अशी धमकी व्यावसायिकाला देण्यात ...

'Give a room to a drunken party or I will kill you', a crime against a businessman who threatened a businessman | 'दारु पार्टीला रुम दे नाहीतर मारून टाकीन', व्यावसायिकाला धमकी देण्याऱ्याविरोधात गुन्हा

'दारु पार्टीला रुम दे नाहीतर मारून टाकीन', व्यावसायिकाला धमकी देण्याऱ्याविरोधात गुन्हा

पिंपरी :  दारु पार्टी करण्यासाठी नवीन बांधकामात कायमची रुम दे, रुम नाही दिली तर तुला मारून टाकीन, अशी धमकी व्यावसायिकाला देण्यात आली. तसेच व्यावसायिकाच्या कामाच्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि.८) फुगेवाडी येथे सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी हेमंत लक्ष्मण फुगे (वय ४४, रा. फुगेवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विशाल दिनकर (रा. फुगेवाडी) याच्यासह त्याच्या पाच ते सहा साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादी यांना फोन करत तुमच्या चाळीत नवीन होणा-या बांधकामात मला व माझ्या दोस्तांना दारुची पार्टी करता कायमची रुम दे नाहीतर तुला मारुन टाकीन, असे धमकी देत शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांच्या फुगेवाडीतील मालकीच्या प्रेसमध्ये जात प्रिंटर्स चालक दिपक पवार याला मारहाण करत प्रेस बंद करण्यास सांगितले. तेथे उभ्या केलेल्या फिर्यादीच्या मालकीची दुचाकीची लोखंडी पाईप आणि लाकडी दांडक्याच्या साह्याने आरोपींनी करत फिर्यादींना यांना देखील धमकावले, असे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे.

Web Title: 'Give a room to a drunken party or I will kill you', a crime against a businessman who threatened a businessman