'गाडीवर बस नाहीतर अंगावर गाडी घालेन'; निगडीत अल्पवयीन मुलीला अडवून विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 09:30 IST2022-09-08T09:25:02+5:302022-09-08T09:30:02+5:30

२७ वर्षीय तरुणाने विनयभंग केला...

'Get in the car or I will run over you'; Involved molesting a minor girl | 'गाडीवर बस नाहीतर अंगावर गाडी घालेन'; निगडीत अल्पवयीन मुलीला अडवून विनयभंग

'गाडीवर बस नाहीतर अंगावर गाडी घालेन'; निगडीत अल्पवयीन मुलीला अडवून विनयभंग

पिंपरी : आपल्या मैत्रिणीसोबत रस्त्याने जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला अडवून जबरदस्तीने दुचाकीवर बसण्यास सांगितले. गाडीवर बसली नाही तर गाडी अंगावर घालीन, अशी धमकी देत चुकीचे वर्तन करून तिचा २७ वर्षीय तरुणाने विनयभंग केला.

ही घटना निगडी येथे ऑगस्ट २०२२ ते मंगळवार (दि.६) दरम्यान घडली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीविरोधात ‘पास्को’अंतर्गत गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींची मुलगी यांचा आरोपी वारंवार पाठलाग करून मैत्री करण्याचा प्रयत्न करत होता. फिर्यादी मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत रस्त्याने पायी जात असताना आरोपीने तिला आपल्या गाडीवर बसण्यासाठी सांगितले. गाडीवर बसली नाही तर गाडी अंगावर घालण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: 'Get in the car or I will run over you'; Involved molesting a minor girl