लग्नाचे आमिष दाखवून मित्रानेच केला अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 18:53 IST2020-02-01T18:52:22+5:302020-02-01T18:53:48+5:30

चिखलीतील घटना : जबरदस्तीने केला तरुणीचा गर्भपात

friend who sexual harrashment women by showing her the desire to married | लग्नाचे आमिष दाखवून मित्रानेच केला अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून मित्रानेच केला अत्याचार

पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून मित्राने तरुणीशी जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. तसेच तिचा गर्भपात करून शिवीगाळ व मारहाण केली. म्हेत्रेवस्ती, चिखली येथे फेब्रुवारी २०१८ ते २७ जानेवारी २०२० दरम्यान हा प्रकार घडला. 

याप्रकरणी २४ वर्षीय तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनोद नामदेव याजवाड (वय २८, रा. अंजलीनगर, लातूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी मित्र आहेत. ते दोघे म्हेत्रेवस्ती, चिखली येथे एकत्र रहात होते. मी तुझ्याशीच लग्न करणार आहे, असे सांगून आरोपी याने फिर्यादी तरुणीशी जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. तसेच शिवीगाळ करून मारहाण केली. तरुणीचा जबरदस्ती गर्भपात केला. त्यानंतर तरुणीला सोडून निघून गेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: friend who sexual harrashment women by showing her the desire to married