चऱ्होली आणि मोशी येथील जमीन खरेदी करून देतो असे सांगून ४० लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 21:54 IST2021-06-22T21:54:01+5:302021-06-22T21:54:09+5:30
चऱ्होली आणि मोशी येथील जमीन खरेदी करून देतो, असे सांगून मतानी यांच्याकडून सुरुवातीला पाच लाखांचा धनादेश घेतला.

चऱ्होली आणि मोशी येथील जमीन खरेदी करून देतो असे सांगून ४० लाखांची फसवणूक
पिंपरी : जमीन खरेदी करून देतो, असे सांगून ४० लाखांची फसवणूक केली. विजयनगर, काळेवाडी येथे जुलै २०१४ ते २१ जून २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
आनंद अमरनाथ लोणकर (रा. स्पाइन रोड, मोशी), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. विनोद किशनचंद मतानी (वय ४१, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
लोणकर याने चऱ्होली आणि मोशी येथील जमीन खरेदी करून देतो, असे सांगून मतानी यांच्याकडून सुरुवातीला पाच लाखांचा धनादेश घेतला. जमीन खरेदीसाठी काही अंशी मोबदला म्हणून आणखी ३५ लाख रुपये घेऊन त्याची मिळकत खरेदी करून दिली नाही. तसेच मतानी यांनी पैशांची मागणी केली असता आरोपीने शिवीगाळ करून त्यांना मारण्याची धमकी दिली.