शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
5
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
6
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
7
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
8
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
9
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
10
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
11
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
12
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
13
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
14
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
15
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
16
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
17
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
18
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
19
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
20
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती

हाँगकाँगमधून चालवले जाते फसवणुकीचे रॅकेट; पिंपरी-चिंचवड सायबर सेलने पर्दाफाश करून ५ जणांना ठोकल्या बेड्या

By नारायण बडगुजर | Updated: April 10, 2024 16:43 IST

पाच आरोपींनी अनेकांची फसवणूक करून मिळालेले कोट्यवधी रुपये क्रिप्टोकरन्सीद्वारे हाँगकाँगमध्ये पाठवले

पिंपरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळेल, असे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. हे रॅकेट हाँगकाँगमधून चालविले जात असून पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने याप्रकरणी पाच जणांना अटक केली. त्यांनी अनेकांची फसवणूक करून मिळालेले कोट्यवधी रुपये क्रिप्टोकरन्सीद्वारे हाँगकाँगमध्ये पाठवले.   

जुनेद मुख्तार कुरेशी (२१, रा. टिंगरे नगर, पुणे), आकिफ अन्वर आरिफ अन्वर खान (२९, रा. कोंढवा खुर्द), सलमान मन्सूर शेख (२२), तौफिक गफ्फार शेख (२२), अब्दुल अजीज अन्सारी (२३, तिघेही रा. इंदिरा नगर, लोहगाव रोड, पुणे), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील एका महिलेने नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टलवर (एनसीसीआरपी) तिची फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली होती. त्याबाबत हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास पिंपरी-चिंचवड सायबर सेलकडून सुरू होता. फिर्यादी महिलेला इंस्टाग्रामवर शेअर मार्केट क्लासेस आणि शेअर मार्केट गुंतवणूक संदर्भात एक जाहिरात दिसली. त्यांनी त्यावर क्लिक केले. त्यानंतर दिलेल्या सूचना पाळून पुढे गेल्या असता फिर्यादी महिलेला एका व्हाट्सअप ग्रुपमध्ये सहभागी केले. इन्स्टिट्यूशनल डी मॅट अकाउंट काढण्यासाठी अनोळखी संशयितांनी एक अर्ज पाठवला. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये नव्याने येणाऱ्या कंपन्यांचे आयपीओ खरेदीसाठी महिलेकडून संशयितांनी वेगवेगळ्या बँक खात्यावर ३१ लाख ६० हजार रुपये घेतले. महिलेने गुंतवलेली रक्कम परत मागितली असता ती रक्कम देण्यासाठी संशयितांनी चॅरिटी डोनेशन म्हणून आणखी चार लाख रुपये घेतले.

फिर्यादी महिलेने ज्या बँक खात्यांवर पैसे पाठवले होते, त्या खात्यांचे सायबर सेलने तांत्रिक विश्लेषण केले. त्यानुसार बँक खाते हाताळणारे संशयित निष्पन्न करून पोलिसांनी पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून सात मोबाईल फोन, रोख रक्कम मोजण्याची मशीन, आठ डेबिट कार्ड, १२ धनादेशपुस्तिका, एक खातेपुस्तक आणि सात लाखांची रोकड जप्त केली.

पिंपरी-चिंचवड सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, पोलिस अंमलदार नितेश बिचेवार, अतुल लोखंडे, श्रीकांत कबुले, कृष्णा गवळी, रजनिश तारु, सौरभ घाटे, आशा सानप, ईश्वरी आंभरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे हाँगकाँगला

अटक केलेल्या संशयितांकडे १२० बँक खाते मिळून आले. त्या खात्यांवर संशयितांनी फसवणुकीच्या वेगवेगळ्या प्रकारणांमधील पैसे घेतले. संशयितांनी या खात्यांवरून चार कोटी रुपये रोख स्वरुपात काढून घेतले. खात्यांवर आलेली रक्कम युएसडीटी या क्रिप्टोकरन्सी मार्फत हाँगकाँग या देशात पाठवली. या खात्यांबाबत ७५ पेक्षा अधिक तक्रारी आहेत. 

मुख्य सुत्रधार हाँगकाँगमध्ये

फसवणूक प्रकरणातील मुख्य सुत्रधार ग्रेग हा हाँगकाँग येथे वास्तव्यास आहे. तिथून तो फसवणुकीचे नेटवर्क चालवतो. हाँगकाँगमधून सोशल मीडियासाठी जाहिराती आणि लिंक तयार केल्या जातात. त्या जाहिराती पाहून कोणी संपर्क केल्यास त्या नागरिकांना लगेच फोन येण्यास सुरुवात होते.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइमMONEYपैसाfraudधोकेबाजीSocialसामाजिक