बुल मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने दीड कोटीचा गंडा; दोघांना अटक, दुबई कनेक्शन समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 22:00 IST2025-10-03T21:59:37+5:302025-10-03T22:00:06+5:30
चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक; पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची कोल्हापूरमध्ये कारवाई

बुल मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने दीड कोटीचा गंडा; दोघांना अटक, दुबई कनेक्शन समोर
Pimpri Crime: पिंपरी बुल मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून तळेगाव दाभाडे येथील एका व्यक्तीची एक कोटी ५४ लाख ७६ हजार ५५४ रुपयांची फसवणूक झाली होती. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी कोल्हापूर येथील दोघांना अटक केली. हे आरोपी मुंबईला पळून जात असताना त्यांना ताब्यात घेतले. अक्रम शमशुद्दीन शेख (३३, कोल्हापूर), विनय सत्यनारायण राठी (३४, कोल्हापूर), अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
तळेगाव येथील तक्रारदार गूगलवर गुंतवणुकीबाचत माहिती घेत असताना त्यांना कुल मार्केटबाबत माहिती मिळाली. इंग्लंड येथील क्रमांकावरून त्यांना अज्ञातांचे फोन आले. संशयितांनी बुल मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून नऊ लाख ८४ हजार ५५४ रुपये आणि एक कोटी ४४ लाख ७२ हजार रुपये किमतीचे दोन बिटकॉइन घेत त्यांची फसवणूक केली. पोलिस मागावर असल्याची चाहूल लागताच संशयित अक्रम आणि विनय हे कारने मुंबई येथे पळून जाण्याच्या तयारीत होते. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वरील उर्स टोल नाक्यावर त्यांचा पाठलाग करून त्यांना अटक केली. अक्रम हा वेगवेगळे बैंक अकाउंट प्राप्त करत होता. तर विनय हा सिमकार्ड कंपनीत नोकरी करत होता.
या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलिस आयुक्त विनायक कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक वैभव पाटील, सागर पोमण, रोहित डोळस, प्रकाश कातकाडे, कॉनटेबल सुभाष पाटील, सोपान बोधवड, हेमंत खरात, माधव आरोटे, अभिजित उकिरडे, विशाल निचित, अतुल लोखंडे, प्रवीण शेळकंदे, स्वप्नील खणसे यांच्या पथकाने केली.
दुबईतील व्यक्तीच्या संपर्कात राहून गुन्हे
विनय संबंधित बैंक खाते ऑनलाइन अपडेट ते मुंबई येथील विराज ओशी नावाच्या व्यक्तीला सायबर फसवणुकीसाठी देत होते. आरोपी दुबई येथील एका व्यक्तीच्या संपर्कात राहून हे गुन्हे करत अमलशचे निष्पन्न झाले.