शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

मुलाची  ‘बाबागाडी’ ऑनलाइन विकणे बाबांना पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 4:46 PM

मुलाची बाबा गाडी ओएलएक्सवर विक्री करणे मिलिटरीच्या मेजरला चांगलेच महागात पडले

ठळक मुद्दे बँक खात्यातून 19 हजार 508 रुपयांची फसवणूक

पिंपरी : मुलाची बाबा गाडी ओएलएक्सवर विक्री करणे मिलिटरीच्या मेजरला चांगलेच महागात पडले. तुम्हाला पैसे पाठवितो, असे सांगून क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले. त्यानंतर बँक खात्यातून 19 हजार 508 रुपये डेबीट करून फसवणूक केली.  पिंपळे गुरवर येथे गुरुवारी (दि. 26) सकाळी दहा ते पावणेबाराच्या दरम्यान हा प्रकार घडला.

याप्रकरणी दौलत संपतराव बोरकर (वय 35, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहारुना ऐसुब (रा. भाटपूर, राजस्थान) व मोकम निरनसिंग आदिवासी (रा. खैरा, मध्यप्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बोरकर मिलीट्रीत मेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मुलाची प्राम (बाबागाडी) विक्रीसाठी त्यांनी ओएलएक्सवर जाहिरात दिली. त्यानंतर आरोपींनी फियार्दी यांच्याशी फोनवरून संपर्क साधून आम्ही तुम्हाला पैसे पाठवितो असे सांगितले. तुम्हाला क्यूआरकोड पाठविला आहे, तो स्कॅन करा, त्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील, असे आरोपींनी सांगितले. त्यानंतर फियार्दी यांनी कोड स्कॅन केला असता, त्यांच्या बँक खात्यातील 19 हजार 508 रुपये डेबिट झाले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडonlineऑनलाइनfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस