Fraud with farmer through fake sale contract : crime against 11 person | बनावट विक्री कराराद्वारे शेतकऱ्याची फसवणूक : ११ जणांवर गुन्हा
बनावट विक्री कराराद्वारे शेतकऱ्याची फसवणूक : ११ जणांवर गुन्हा

पिंपरी : जमीन हडपण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे तयार केली. त्याआधारे अकरा जणांनी बनावट विक्री करार करून मूळ शेतकऱ्याची फसवणूक केली. ही घटना आझादनगर, चऱ्होली येथे घडली. याप्रकरणी प्रमोद प्रकाश तापकीर (वय ४१, रा. आझादनगर, चऱ्होली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, रामसिंग सरदारसिंग बगलाल (वय ६३), सुशीला रामसिंग बगलाल (वय ५६), रणजितकौर रामसिंग बगलाल (वय ३२), पप्या रामसिंग बगलाल (वय ३०), सुमन चंदरसिंग बगलाल (वय ६१, सर्व रा. चऱ्होली),  राहुलसिंग चंदरसिंग बगलाल (वय ३५), अमरसिंग चंदरसिंग बगलाल (वय ३०), सुनीता चंदरसिंग बगलाल (वय ३४), शीतल चंदरसिंग बगलाल (वय ३२), गीता चंदरसिंग बगलाल (वय ३०), आदेश भाऊसाहेब हांडे (वय ३५) सर्व रा. आवताडवाडी, हांडेवाडी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद आणि त्यांचे नातेवाईक छबू लक्ष्मण तापकीर यांच्यामध्ये वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद आहे. आरोपी हे छबू यांचे नातेवाईक नसताना देखील त्यांनी मालमत्ता हडपण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे बनवली. बनावट असलेली कागदपत्रे खरी असल्याचे भासवून सार्वजनिक नोंदी बदलून शासकीय अधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिली. वेगवेगळ्या महसूल अधिकारी आणि दिवाणी न्यायालयात खोटी प्रमाणपत्रे आणि खोट्या साक्ष देऊन प्रमोद तापकीय यांच्या मालमत्तेचे बनावट विक्री करार करून फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Fraud with farmer through fake sale contract : crime against 11 person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.