मुलांना होस्टेलवर सोडण्याच्या बहाण्याने पळविली चारचाकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 16:43 IST2020-01-03T16:39:25+5:302020-01-03T16:43:31+5:30
मुलांना अहमदनगर येथे होस्टेलवर सोडायचे आहे, असे सांगून चारचाकी वाहन घेतले.

मुलांना होस्टेलवर सोडण्याच्या बहाण्याने पळविली चारचाकी
पिंपरी : मुलांना अहमदनगर येथे होस्टेलवर सोडायचे आहे, असे सांगून चारचाकी वाहन घेतले. मात्र, ती चारचाकी परत न करता फसवणूक केली. भोसरी येथे दि. 17 नोव्हेंबर 2019 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. सुधाकर पुडलिक पोळकर (वय 40, रा. चिखली) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयूर माने (वय 35) व गौरी माने (वय 30, रा. न-हे, आंबेगाव, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी त्यांच्या मुलांना अहमदनगर येथे होस्टेलवर सोडायचे आहे, असा बहाणा करून फिर्यादी यांना त्यांचे चारचाकी वाहन मागितले. त्यामुळे फिर्यादी यांनी विश्वासाने आरोपी माने यांना चारचाकी दिली. मात्र आरोपी यांनी अपहार करण्याच्या उद्देशाने चारचाकी घेऊन गेले. सदरची चारचाकी परत न करता फिर्यादी यांची फसवणूक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.