शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

वाहन चालविण्याच्या हौसेपायी अल्पवयीन मुलाने चोरल्या चार दुचाकी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2020 1:07 PM

चार लाखांच्या दुचाकी जप्त

ठळक मुद्देवाहन चोरी प्रतिबंधात्मक पोलिसांची कारवाई

पिंपरी : वाहन चालविण्याच्या हौसेपायी चार दुचाकींची चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चार लाख ५ हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सांगवी पोलिसांच्या वाहन चोरी प्रतिबंधात्मक पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्याच्या स्तरावरील वाहन चोरी प्रतिबंधक पथकाचे पोलीस कर्मचारी अरुण नरळे व नितीन खोपकर गुरुवारी (दि. ६) सायंकाळी गस्त करीत होते. त्यावेळी साडेपाचच्या सुमारास त्यांना माहिती मिळाली की, एक अल्पवयीन मुलगा चोरीची दुचाकी वापरत आहे. त्यानुसार कृष्णा चौक, नवी सांगवी येथे सापळा रचून पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशी केली असता त्याने  दुचाकी चोरी केल्याचे कबुल केले. तसेच त्याने आणखी दुचाकी चोरल्याचे तपासात सांगितले. सांगवी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चोरीच्या चार लाख पाच हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी या अल्पवयीन मुलाकडून जप्त करण्यात आल्या आहेत. मला वेगवेगळ्या दुचाकी चालविण्याची हौस असल्याने चार दुचाकींची चोरी केली, असे त्याने तपासात सांगितले आहे. सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गुळीग, यशवंत साळुंके, पोलीस कर्मचारी कैलास केंगले, सुरेश भोजणे, चंद्रकांत भिसे, नितीन दांगडे, रोहिदास बोहाडे, अरुण नरळे, नितीन खोपकर, विनायक देवकर, अनिल देवकर, हेमंत गुत्तीकोडा यांनी ही कारवाई केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtwo wheelerटू व्हीलरtheftचोरीArrestअटकPoliceपोलिस