लहान मुलांचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 17:28 IST2020-02-07T17:27:35+5:302020-02-07T17:28:50+5:30
सोशल मीडियावर केंद्रीय स्तरावरील काही संस्था आणि पोलीस यंत्रणांचा ' वॉच '

लहान मुलांचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल
पिंपरी : चाईल्ड पोर्नोग्राफी रोखण्यासाठी केंद्र सरकारतर्फे कायदा करण्यात आला आहे. त्यानुसार सोशल मीडियावर केंद्रीय स्तरावरील काही संस्था आणि पोलीस यंत्रणांचा ' वॉच ' आहे. असे व्हिडीओ व्हायरल करणारे अकाऊंटचा सोशल मीडियावर शोध घेण्यात येत असून, पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवडपोलिसांकडून अशा अकाऊंटधारकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यानुसार गुरुवारी (दि. ६) बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या एक महिन्यात नऊ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
गुरुवारी दाखल करण्यात आलेली पहिली घटना २९ एप्रिल २०१९ रोजी वाकड येथे घडली. महेश सहानी याने स्वत:च्या फेसबुक अकाउंटवरून लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णा स्वामी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
दुसरी घटना ५ मे २०१९ रोजी चिखली येथे घडली. बालाराम दास याने स्वत:च्या फेसबुक अकाउंटवरून लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बागुल यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
तिसरी घटना ५ ऑगस्ट २०१९ रोजी दावडमळा, चाकण येथे घडली. किशोर भानुदास वाघमारे (वय २४, रा. दावडमळा, चाकण) याने स्वत:च्या फेसबुक अकाउंटवरून लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चौथी घटना २४ एप्रिल २०१९ रोजी नाणेकरवाडी, चाकण येथे घडली. अजय माताप्रसाद सागर (वय २५, रा. म्हेत्रेवाडी, चिखली) याने स्वत:च्या फेसबुक अकाउंटवरून लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार राजू किसन राठोड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.