Pimpri Chinchwad: लग्नानंतर नोकरी सोडण्याचा तगादा, विवाहितेने संपविले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 20:10 IST2024-02-23T20:05:59+5:302024-02-23T20:10:02+5:30
फिर्यादी यांच्या मुलीचे लग्न झाल्यापासून तिला नोकरी सोडून दे, असा तगादा तिच्या सासरच्या मंडळींनी लावला होता...

Pimpri Chinchwad: लग्नानंतर नोकरी सोडण्याचा तगादा, विवाहितेने संपविले जीवन
पिंपरी : नोकरी सोडून देण्याच्या कारणावरून; तसेच चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ केला. या छळाला कंटाळून ३३ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. २२) सकाळी उघडकीस आली.
याप्रकरणी विवाहितेचे वडील सर्जेराव होनाजी तुरुकमारे (६४, रा. पिंपरी) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नीलेश देवराम सरोदे व एका महिलेवर गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीचे लग्न झाल्यापासून तिला नोकरी सोडून दे, असा तगादा तिच्या सासरच्या मंडळींनी लावला होता; तसेच चारित्र्याच्या संशयावरून व घरगुती कारणावरून वारंवार तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून तिने गुरुवारी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.