पिंपळे गुरवला पाच वाहनांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 12:59 IST2019-09-16T12:58:17+5:302019-09-16T12:59:03+5:30

कोयता व सिमेंटच्या गट्टूने दोन रिक्षा, दोन दुचाकीसह अन्य एका वाहनाची पाच जणांनी तोडफोड करून नुकसान केले. तसेच एका जणाला कानाखाली चापट मारून त्याच्या खिशातील सुमारे एक हजार दोनशे रुपये काढून घेतले. पिंपळे गुरव येथे रविवारी हा प्रकार घडला. 

Five vehicles vandalized in Pimple | पिंपळे गुरवला पाच वाहनांची तोडफोड

पिंपळे गुरवला पाच वाहनांची तोडफोड

पिंपरी : कोयता व सिमेंटच्या गट्टूने दोन रिक्षा, दोन दुचाकीसह अन्य एका वाहनाची पाच जणांनी तोडफोड करून नुकसान केले. तसेच एका जणाला कानाखाली चापट मारून त्याच्या खिशातील सुमारे एक हजार दोनशे रुपये काढून घेतले. पिंपळे गुरव येथे रविवारी हा प्रकार घडला. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी विनोद रतन गायकवाड (वय ३१, रा. गांगर्डेनगर, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॅनियल चांदणे, जोग्या, लाल्या, अभिजित ढमाले (सर्व रा. जुनी सांगवी) व गणेश मोटे (रा. पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गायकवाड रिक्षाचालक असून, त्यांची स्वत:ची रिक्षा आहे. 
         फिर्यादी गायकवाड शनिवारी रात्री जेवण करून त्यांच्या राहत्या घराच्या बाहेर बसले होते. त्यावेळी साडेबाराच्या सुमारास आरोपी दोन दुचाकीवरून तेथे आले. त्यानंतर आरोपी जोग्या म्हणाला, ‘‘येथे का बसला आहे. योग्या जगतापच्या जिवावर उड्या मारता का? त्याच्याकडे आता बघतोच.’’ तसेच फिर्यादी गायकवाड यांच्या कानाखाली चापट मारून त्यांच्या शर्टाच्या खिशातील सुमारे एक हजार २०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर फिर्यादी गायकवाड यांच्या रिक्षासह आणखी एक रिक्षा, दोन दुचाकी व अन्य एका वाहनाची अशा एकूण पाच वाहनांची कोयता व सिमेंटच्या गट्टूने तोडफोड करून नुकसान केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Five vehicles vandalized in Pimple