शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडमध्ये पाच वाहनचोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; अद्याप 'मास्टरमाईंड' मोकाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 17:25 IST

‘वाहनचोर सुसाट, मास्टरमाईंड मोकाट’ असे वृत्त ‘लोकमत’ने वेळोवेळी सविस्तर प्रसिद्ध केले आहे.

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड शहरात वाहनचोरीचे प्रकार सातत्याने समोर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात वाहनचोरीचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे वाहनधारक धास्तावले असून, वाहनचोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे. त्यामुळे पोलीस वाहनचोरांच्या शोधात आहेत. यातील पाच वाहनचोरांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. तसेच चोरीची वाहने त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहेत. ‘वाहनचोर सुसाट, मास्टरमाईंड मोकाट’ असे वृत्त ‘लोकमत’ने वेळोवेळी सविस्तर प्रसिद्ध केले आहे. वाहनचोर मास्टरमाईंडचा शोध घेणे आवश्यक आहे. अजय आनंद भोसले (वय २०, रा. हुलावळे वस्ती, हिंजवडी, मूळ रा. तुगाव, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) आणि उल्हास विठ्ठल मोरे (वय २३, रा. फुगेवाडी, मूळ रा. जुळे सोलापूर) असे हिंजवडी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर चिंचवड पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. वाहन चोरीच्या एका गुन्ह्यातील आरोपी हिंजवडी येथील चौकात येणार आहेत, अशी माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून आरोपी अजय भोसले आणि उल्हास मोरे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता दोघांनी कंपनीच्या गेट समोरून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. याबाबत युवराज बबन शिंगाडे (वय ३३, रा. आंबेगाव पठार) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शिंगाडे हिंजवडी फेज दोन येथील कंपनीत नोकरी करतात. ७ आॅगस्ट रोजी ते सकाळी कंपनीत आले. त्यांनी त्यांची दुचाकी कंपनीच्या गेटसमोर पार्क केली. सायंकाळी पावणे सातला कामावरून कंपनीच्या बाहेर आले असता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे समोर आले होते. आरोपी अजय आणि उल्हास यांनी पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आणखी एक दुचाकी चोरल्याचे पोलीस तपासात सांगितले. पोलिसांनी ४० हजारांच्या दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत. हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे व तपास पथकातील कर्मचारी यांनी ही कामगिरी केली. 

अल्पवयीन तीन मुले ताब्यातदुचाकीवरून आलेल्या तीन अल्पवयीन मुलांना थांबवून चिंचवड पोलिसांनी त्यांच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, इम्पायर इस्टेट ब्रिजखालून दुचाकी चोरल्याचे त्यांनी सांगितले. मौजमजा करण्यासाठी व फिरण्यासाठी खडकी, चतुश्रुंगी, हिंजवडी, वाकड, एमआयडीसी भोसरी येथून रिक्षा व दुचाकी चोरल्याचे त्यांनी कबूल केले. चोरी केलेल्या तीन रिक्षा व सहा दुचाकी असा तीन लाख ५० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केला. चिंचवड, वाकड, हिंजवडी, एमआयडीसी भोसरी, चतुश्रुंगी, खडकी या पोलीस ठाण्यांमध्ये तिघांवर गुन्हे दाखल आहेत. चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस कर्मचारी पांडुरंग जगताप, स्वप्नील शेलार, रुषीकेश पाटील, विजयकुमार आखाडे, नितीन राठोड, पंकज भदाणे, गोविंद डोके व अमोल माने यांनी केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीThiefचोरtwo wheelerदुचाकीfour wheelerफोर व्हीलरArrestअटकPoliceपोलिस