शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत; घटनेची चौकशी करणार, गिरीश महाजन यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:44 IST

जखमींच्या उपचाराचा सर्व खर्चही शासन करणार असून या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल

पिंपरी : कुंडमळा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाच्या वतीने पाच लाखांची मदत करण्यात येणार आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्चही शासन करणार आहे. तसेच या घटनेची चौकशी करण्यात येईल, असे राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

कुंडमळा येथे भेट देऊन परिस्थितीचा आणि बचाव कार्याचा मंत्री महाजन यांनी आढावा घेतला. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलिस सह आयुक्त शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उप विभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, विशाल गायकवाड, तहसीलदार विक्रम देशमुख उपस्थित होते.

जखमींच्या नातेवाइकांशी संपर्क

कुंडमळा दुर्घटनेतील जखमींची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाहीत. जखमींच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्याचे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पूल कोसळण्याचे कारण अद्याप अस्पष्ट

या पुलाची बांधणी किती वर्षांपूर्वी झाली होती, त्याची देखभाल कितपत केली जात होती, याबाबत सध्या काहीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे.

यांनी दिली भेट

राज्याचे मंत्री गिरीश महाजन, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे, भंडारा डोंगर देवस्थान अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांनी घटनास्थळाला भेट दिली.

टॅग्स :PuneपुणेGirish Mahajanगिरीश महाजनmavalमावळAccidentअपघातMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliticsराजकारण