शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

बोगस एफडीआर प्रकरणी पाच ठेकेदारांवर गुन्हे दाखल; पिंपरी चिंचवड महापालिकेची फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 9:25 PM

बनावट बॅंक गॅरंटी सादर करून मिळवली होती ५२ कामे

पिंपरी : बोगस एफडीआर सादर करून पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थापत्य विषणक कामे मिळविल्याप्रकरणी पाच ठेकेदारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. बोगस एफडीआर सादर करून पाच ठेकेदारांनी ५२ कामांचे कॉन्ट्रॅक्ट घेतले होते. महापालिकेची कामे घेताना एफडीआर अथवा बँक गॅरंटी द्यावी लागते. मात्र यात बोगस एफडीआर सादर केल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर महापालिका आयुक्तांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले हाेते.  

महापालिकेच्या लेखा विभागाचे अधिकारी रमेशकुमार विठ्ठलराव जोशी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २६) फिर्याद दिली. त्यानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले. फसवणुकीचा पहिला गुन्हा मे. पाटील अँड असोसिएटचे मालक सुजित सूर्यकांत पाटील (वय २६, रा. भोसरी) यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. मे. पाटील अँड असोसिएटने महापालिकेची पाच कामे घेतली होती. त्यात त्यांनी ठाणे जनता सहकारी बँक, आळंदी शाखा यांचा एफडीआर सादर केला. हा एफडीआर बनावट असल्याचे आढळून आले आहे.फसवणुकीचा दुसरा गुन्हा मे. कृती कन्स्ट्रक्शनचे मालक विशाल हनुमंत कुऱ्हाडे (वय २९, रा. पिंपरी) यांच्या विरोधात दाखल करण्यात आला. मे. कृती कन्स्ट्रक्शनने महापालिकेची चार कामे घेतली होती. त्यात त्यांनी ठाणे जनता सहकारी बँक, आळंदी शाखा यांचा बनावट एफडीआर सादर केला.

फसवणुकीचा तिसरा गुन्हा मे. एस. बी. सवईचे मालक संजय बबन सवई (रा. चिंचवड) यांच्या विरोधात दाखल केला. मे. एस. बी. सवईने महापालिकेची सात कामे घेतली होती. त्यात त्यांनी ठाणे जनता सहकारी बँक, आळंदी शाखा यांचा बनावट एफडीआर सादर केला. 

फसवणुकीचा चौथा गुन्हा मे. वैदेही कन्स्ट्रक्शनचे दयानंद जीवन मळगे (वय ४७, रा. भोसरी) यांच्या विरोधात दाखल करण्यात आला. मे. वैदेही कन्स्ट्रक्शनने महापालिकेची १२ कामे घेतली होती. त्यात त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, राजगुरू नगर शाखा, पंजाब नॅशनल बँक नाना पेठ पुणे यांचा बनावट एफडीआर महापालिकेला सादर केला.   

फसवणुकीचा पाचवा गुन्हा मे. डी. डी. कन्स्ट्रक्शनचे मालक दिनेश मोहनलाल नवानी (वय २८, रा. पिंपरी) यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. मे. डी डी कन्स्ट्रक्शनने महापालिकेची २४ कामे घेतली होती. त्यात त्यांनी पंजाब नॅशनल बँक नाना पेठ पुणे शाखा यांचा बनावट एफडीआर सादर केला.  

‘त्या’ ठेकेदारांवर कधी गुन्हे दाखल होणार?महापालिकेची विविध कामे मिळविण्यासाठी ठेकेदारांमध्ये चढाओढ असते. असे करताना काही ठेकेदारांनी बोगस एफडीआर सादर केल्याचे समोर आले. याप्रकरणी १८ ठेकेदारांना दोषी धरण्यात आले होते. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले होते. त्याबाबत पोलिसांना पत्र देखील दिले होते. मात्र महापालिकेकडून तक्रारदार पुढे येत नव्हता. त्यामुळे गुन्हे दाखल करण्याबाबत अडचणी येत होेत्या. त्याबाबत ‘लोकमत’ने मंगळवारी (दि. २६) सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर मंगळवारी पाच ठेकेदारांविरोधात गुन्हे दाखल केले. मात्र उर्वरित १३ ठेकेदारांचे काय, त्यांच्यावर गुन्हे कधी दाखल होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfraudधोकेबाजीPoliceपोलिसcommissionerआयुक्तCrime Newsगुन्हेगारी