कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

By विश्वास मोरे | Updated: June 15, 2025 17:26 IST2025-06-15T17:25:30+5:302025-06-15T17:26:11+5:30

मावळातील तळेगाव दाभाडे आणि देहू गावच्या मध्ये कुंड मळा आहे. इंद्रायणी नदीवर कुंडमळा येथे वर्षविधारासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. त्या ठिकाणी असणारा साकपूल हा जुना झालेला आहे.

First victim in Maval Kundamala Bridge Collapses accident Woman body found during rescue operations | कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

मावळ ( पिंपरी चिंचवड) : रविवार सुट्टीचा दिवस, पर्यटकांसाठी घातवार ठरला आहे. मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमाळा येथील साकव पूल कोसळल्याने वीस ते पंचवीस पर्यटक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे.
 
अधिकच्या माहितीनुसार, घटनास्थळी तळेगाव पोलीस, पिंपरी चिंचवड अग्निशामक दल, पी एम आर डी ए अग्निशामक दल, लष्कराचे  एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. तसेच अपघातातील जखमी आणि मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका ही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींना रुग्णालयात घालवण्यात आले आहे तर एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. तिची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
 



दरम्यान, मावळातील तळेगाव दाभाडे आणि देहू गावच्या मध्ये कुंड मळा आहे.  इंद्रायणी नदीवर कुंडमळा येथे वर्षविधारासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. त्या ठिकाणी असणारा साकपूल हा जुना झालेला आहे. आज दुपारी ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी झाली होती. हा पूल अत्यंत अरुंद आहे. तसेच या ठिकाणी मोठी वाहने जाऊ शकत नाही. तसेच पुलावर वाहन गेल्यानंतर हादरे बसतात.  पुलावर दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर पर्यटक उभे राहून नदीतून वाहणारे पाणी पाहत होते. त्यावेळी अचानक लोखंडे आणि काँक्रीटमध्ये असणारा पूल कोसळला. आणि काही क्षणात पुलावरील सर्वजण नदीपात्रात कोसळले.

अचानक घडलेल्या या घटनेने या ठिकाणी तारांबळ उडाली. काही तरुणांनी पाण्यातून वाहून जाणाऱ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केलाआणि पुलावर असणारे अनेक जण नदीच्या पाण्यात वाहून गेले. अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बघ्याची  गर्दी झाली होती. त्यानंतर काही वेळातच पोलीस आणि अग्निशामक दलाचे पथक दाखल झाले आहे व पाण्यात वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध घेतला जात आहे.



पुल अत्यंत जुना झालेला; प्रशासनाचे दुर्लक्ष

इंद्रायणी नदीवरील कुंडामाळा येथील पूल अत्यंत जुना झाला आहे या संदर्भातील फलक या ठिकाणी लावला होता. या पुलाची दुरुस्ती ही अनेक वेळा केली आहे.  तरीही त्या ठिकाणाहून वाहने नेण्यात येत होती. तसेच या परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नव्हती.

Web Title: First victim in Maval Kundamala Bridge Collapses accident Woman body found during rescue operations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.