Pimpri Chinchwad: काळेवाडीमध्ये अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाकडून गोळीबार

By प्रकाश गायकर | Updated: September 13, 2024 14:56 IST2024-09-13T14:55:39+5:302024-09-13T14:56:12+5:30

पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या माजी नगरसेवकासह दोघांना अटक केली

Firing by former corporator of Ajit Pawar group in Kalewadi | Pimpri Chinchwad: काळेवाडीमध्ये अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाकडून गोळीबार

Pimpri Chinchwad: काळेवाडीमध्ये अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाकडून गोळीबार

पिंपरी : शहरातील काळेवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉटेलमध्ये बसलेल्या दोघांनी पिस्तुलातून टेबलवर गोळी झाडली. ही घटना गुरुवारी (दि. १२) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या माजी नगरसेवकासह दोघांना अटक केली आहे. 

याप्रकरणी तुषार लक्ष्मीचंद भोजवानी (वय २४, रा. पाचपीर चौक, पंचनाथ कॉलनी, काळेवाडी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सचिन दत्तू नढे याला अटक करण्यात आली आहे. तर माजी नगरसेवक विनोद जयवंत नढे यांची चौकशी सुरू आहे.  
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन दत्तू नढे, विनोद जयवंत नढे, तुकाराम नढे, माऊली नढे हे काळेवाडी पेट्रोल पंप समोर राहुल बार अँड खुशबू हॉटेल मध्ये गुरुवारी रात्री पहिल्या मजल्यावर बसले होते. हॉटेलचे मॅनेजर तुषार भोजवानी यांना रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास फटाक्यासारखा मोठा आवाज आला. त्यांनी वरती जाऊन पाहिले असता सचिन नढे याच्या हातामध्ये लोखंडी रिव्हॉल्वर होते. त्याने लोखंडी रिव्हॉल्वरने जेवणाच्या प्लेट ठेवण्याच्या पत्र्याच्या सर्विस टेबलवर फायर केला. त्यामुळे त्याच्या रिव्हॉल्वर मधून सुटलेली गोळी टेबल मधून आरपार जाऊन टेबलला छिद्र पडले. तेथे बुलेटची एक पुंगळी बाजूला पडली होती. गोळीबार झाल्यानंतर हॉटेल मधील ग्राहक घाबरून पळून गेले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विनोद नढे हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत.

Web Title: Firing by former corporator of Ajit Pawar group in Kalewadi