देहूरोडला भाजपा नगरसेवकावर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 20:46 IST2019-06-13T20:45:09+5:302019-06-13T20:46:03+5:30
देहूराेड कॅन्टाेन्मेंट बाेर्डाचे भाजपाचे नगरसेवक विशाल खंडेलवाल यांच्यावर गाेळीबार झाल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी घडली.

देहूरोडला भाजपा नगरसेवकावर गोळीबार
पिंपरी : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे भाजपाचे नगरसेवक जिकी उर्फ विशाल खंडेलवाल यांच्यावर अज्ञाताकडून गोळीबार झाला. गुरुवारी (दि. १३) सायंकाळी ही घटना घडली. देहूरोड परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
खंडेलवाल यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गोळीबार करणारे पसार झाले आहेत. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तपासत आहेत. खंडेलवाल यांच्यावर गोळीबार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे घटनास्थळी गर्दी झाली. गोळीबाराची घटना झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट आहे. देहूरोड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.