पिंपरीतील आगी :दोन दुकानांसह पीएमपी बस स्टॉपही भस्मसात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 16:54 IST2019-04-18T16:53:21+5:302019-04-18T16:54:00+5:30

पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाकडून गावाकडे जाणाऱ्या  रस्त्यावरील दोन दुकाने जळून खाक झाली आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

Fire at Pimpri: PMP bus stop with two shops are destroyed | पिंपरीतील आगी :दोन दुकानांसह पीएमपी बस स्टॉपही भस्मसात

पिंपरीतील आगी :दोन दुकानांसह पीएमपी बस स्टॉपही भस्मसात

पिंपरी :पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाकडून गावाकडे जाणाऱ्या  रस्त्यावरील दोन दुकाने जळून खाक झाली आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

 पुणे मुंबई महामार्गावरील आंबेडकर चौकातून पिंपरीकडे जाणारा रस्ता आहे. चौकापासून शंभर मीटरच्या अंतरावर डावीकडे असणाºया दोन दुकांनाना दुपारी सव्वा बाराच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये दुकानांसह पीएपीएलचा बस स्टॉपही जळून खाक झाला आहे. नागरिकांनी अग्निशामन दलाला माहिती दिल्यानंतर काही वेळाने कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यात यश आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

(अधिक माहिती थोड्याच वेळात)

Web Title: Fire at Pimpri: PMP bus stop with two shops are destroyed