पोलिसाशी हुज्जत घालणाऱ्या तिघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 16:57 IST2019-05-12T16:56:30+5:302019-05-12T16:57:58+5:30
पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसाशी हुज्जत घालणाऱ्या तिघांवर गुन्हा
पिंपरी : पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल प्रल्हाद पाटील (वय २५), शुभम प्रल्हाद पाटील (वय २७), अमित शांतीलाल पाटील (वय २७, तिघेही रा. रा. साईराम कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवडगाव) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी शकूर मोहम्मद फकीर मोहम्मद तांबोळी (वय ४१) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तांबोळी हे आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असून शनिवारी ते निगडी, प्राधिकरणातील भेळ चौक येथे नाकाबंदी करीत होते. दरम्यान, बिग इंडिया चौकाकडून भेळ चौकाकडे (एमएच ३९, आर ८६६३) या क्रमांकाच्या दुचाकीवरुन आरोपी ट्रीपल सीट जात होते. पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांच्याकडे वाहन परवाना नसल्याचे समोर आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता आरोपी हे पोलीस कर्मचारी पाटील यांच्याशी हुज्जत घालू लागले. त्यांच्या खासगी वाहनाचीही काच फोडली. दरम्यान, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.