बँकेच्या सीईओकडून शिपाई महिलेचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 13:16 IST2022-12-14T13:15:35+5:302022-12-14T13:16:47+5:30

बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्या (सीईओ) विरोधात गुन्हा दाखल

Female constable molested by bank CEO | बँकेच्या सीईओकडून शिपाई महिलेचा विनयभंग

बँकेच्या सीईओकडून शिपाई महिलेचा विनयभंग

पिंपरी : बँकेत कामाला असलेल्या शिपाई महिलेशी गैरवर्तन करून बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याने विनयभंग केला. ही घटना मागील दीड महिन्यापूर्वी पिंपरी येथे घडली होती. या प्रकरणी पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.१३) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कामाला असलेल्या बँकेत आरोपी हा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतो. त्याने सुमारे दीड महिन्यापुर्वी फिर्यादी यांना चहा आणण्यास सांगून टेबल खाली सफाई नीट झाली नाही, असे सांगितले. फिर्यादी या टेबला जवळ पाहण्यासाठी गेल्या असता आरोपीने त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून मनात लज्ज उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच या घटनेबाबात कोठे वाच्यता केल्यास खोटे गुन्हे नोंद करण्याचा तसेच कामावरून काढून टाकण्याची धमकी आरोपीने फिर्यादीला दिली.

Web Title: Female constable molested by bank CEO