पिंपरी : बहिणीच्या पतीने दुसरे लग्न केल्याच्या कारणावरून मेव्हण्याने शिवीगाळ केली. तसेच जेष्ठ नागरिक असलेल्या त्याच्या वडिलांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पळवून नेले. म्हेत्रेवस्ती, चिखली येथे सोमवारी (दि. 23) ही घटना घडली. अपहरण केल्याप्रकरणी मेव्हणा व त्याच्या साथीदारांवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी दत्तात्रय प्रभू मदने (वय 30, रा. म्हेत्रेवस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. कल्याण संभाजी बिडगर (रा. कात्रज) असे आरोपीचे नाव आहे. तर प्रभू सर्जेराव मदने (वय 60) असे पळवून नेलेल्या वडिलांचे नाव आहे.फिर्यादी दत्तात्रय यांचा भाऊ बापू मदने याने दुसरे लग्न केल्याच्या कारणावरून त्याचा मेव्हणा आरोपी बिडगर याने त्याच्या तीन साथीदारांसह दत्तात्रय व भाऊ मदने यांचे वडील प्रभू मदने यांना शिवीगाळ केली. तसेच जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पळवून घेऊन गेले. त्यानंतर आरोपी यांनी प्रभू मदने यांना सोडून दिले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
दुसरे लग्न केल्याच्या रागात वडिलांना पळविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 13:20 IST
बहिणीच्या पतीने दुसरे लग्न केल्याच्या कारणावरून मेव्हण्याने शिवीगाळ केली. तसेच जेष्ठ नागरिक असलेल्या त्याच्या वडिलांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पळवून नेले.
दुसरे लग्न केल्याच्या रागात वडिलांना पळविले
ठळक मुद्देचिखलीतील प्रकार : मेव्हण्यासह त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हादुसरे लग्न केल्याच्या रागात वडिलांना पळविले