वडिलांचा आयसीयूत मृत्यू, मुलाची डॉक्टरांना मारहाण; वायसीएम रुग्णालयातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 21:05 IST2023-12-11T21:04:25+5:302023-12-11T21:05:00+5:30

वायसीएम रुग्णालयात रविवारी (दि. १०) दुपारी सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली...

Father dies in ICU, son beats doctor; Incident at YCM Hospital | वडिलांचा आयसीयूत मृत्यू, मुलाची डॉक्टरांना मारहाण; वायसीएम रुग्णालयातील घटना

वडिलांचा आयसीयूत मृत्यू, मुलाची डॉक्टरांना मारहाण; वायसीएम रुग्णालयातील घटना

पिंपरी : वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मुलाने डॉक्टरला शिवीगाळ करून मारहाण केली. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात रविवारी (दि. १०) दुपारी सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली.

डॉ. ऋषिकेश हनमंत कुदळे (२५, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार महेश राजाराम कुंभार (२५, रा. वाघोली, ता. वरुड, जि. धाराशिव) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. कुदळे हे वायसीएम रुग्णालयात आयसीयू वॉर्डमध्ये नेमणुकीस होते. तिथे महेश कुंभार याचे वडील राजाराम कुंभार यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान राजाराम यांचा मृत्यू झाला. त्याबाबत डॉ. कुदळे यांनी रुग्णाच्या नातेवाइकांना दिली.

त्यानंतर राजाराम यांचा मुलगा महेश आयसीयू वॉर्डमध्ये आला. त्याने डॉ. कुदळे यांच्याकडे वडिलांच्या मृत्यूबाबत चौकशी केली. त्यानंतर वडिलांच्या बेडजवळ जाऊन थोडा वेळ रडला. त्यानंतर रागाने येऊन डॉ. कुदळे यांना मारहाण करत शिवीगाळ केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Father dies in ICU, son beats doctor; Incident at YCM Hospital