किशोर आवारे यांच्यावर जीवघेणा हल्ला; गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 15:19 IST2023-05-12T14:58:42+5:302023-05-12T15:19:41+5:30
गोळीबार झाला तसेच कोयत्याने वार झाल्याची प्राथमिक माहिती

किशोर आवारे यांच्यावर जीवघेणा हल्ला; गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू
पिंपरी : जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या शुक्रवारी (दि.१२) गोळीबार झाला. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना जखमी अवस्थेतील आवारे यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर आवारे हे शुक्रवारी (दि.१२) तळेगाव दाभाड़े नगर परिषदेमध्ये गेले होते. ते इमारतीच्या खाली येत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला तसेच कोयत्याने वार झाले. त्यांना गोळ्या लागल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर आवारे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण गंभीर जखमी झाल्याने उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे तळेगाव शहरात तणावाचे वातावरण आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. किशोर आवारेंचा गोळीबार करून खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून आवारे यांनी तळेगावात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाशी दांडगा जनसंपर्क बनवला होता. सहा वर्षांपूर्वी झालेल्या तळेगाव नगरपरिषद निवडणुकीत जनसेवा विकास समितीचे नगरसेवक निवडून आणून किशोर आवारे यांनी राजकारणात आपले स्थान बळकट केले होते.