आग्या मोहोळाच्या माशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 19:36 IST2018-06-24T19:34:53+5:302018-06-24T19:36:31+5:30

शेतात काम करत असताना अाग्या माेहाेळाच्या माशांनी शेतकऱ्यावर हल्ला केल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

Farmer death due to attach of honny bees | आग्या मोहोळाच्या माशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

आग्या मोहोळाच्या माशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

वडगाव मावळ :  आग्या मोहोळाच्या माशांनी केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वडगाव मावळ येथील कोंडीवडे येथे घडली.   
    ज्ञानोबा  बारकू  लागमण (वय ५०) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. लागमण हे शेतात मशागतीचे काम करत असताना माशांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. त्यांच्या चेहरयावर, मानेवर यासह शरीरावर ठिकठिकाणी माशांनी चावा घेतला. ते मोठमोठ्यांनी ओरडू लागले. त्यावेळी शेतात काम करणारे त्यांचे भाऊ चिंधू व विलास त्याठिकाणी आले. त्यांनी माशा हकलण्याचा प्रयत्न केला. पण त्या गेल्या नाहीत. माशांचा हल्ला सुरुच होता. काही वेळानंतर लागमण यांना जखमी अवस्थेत त्यांना रूग्णालयात दाखल करण्या आले. मात्र, उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
 

Web Title: Farmer death due to attach of honny bees