बनावट आधार कार्ड, पॅन कार्डव्दारे आठ लाखांचं कर्ज घेत फसवणूक; सूस गावातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 04:47 PM2021-06-10T16:47:35+5:302021-06-10T16:47:52+5:30

आरोपीने फिर्यादीचे आधार कार्ड व पॅन कार्ड नंबर प्राप्त करून त्या आधारे बनावट आधार कार्ड व पॅन कार्ड तयार केले..

Fake Aadhaar and pan card fraud by taking loan of Rs 8 lakh ; Incidents in the Sus | बनावट आधार कार्ड, पॅन कार्डव्दारे आठ लाखांचं कर्ज घेत फसवणूक; सूस गावातील घटना

बनावट आधार कार्ड, पॅन कार्डव्दारे आठ लाखांचं कर्ज घेत फसवणूक; सूस गावातील घटना

Next

पिंपरी : बनावट आधार कार्ड पॅन कार्ड तयार केले. त्याचा वापर करून फायनान्स कंपनी कडून आठ लाख २२ हजार ६८६ रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केली. सुसगाव (ता. मुळशी) येथे ३ फेब्रुवारी ते १० मार्च २०२१ या कालावधीत फसवणुकीचा हा प्रकार घडला. 

रनजॉय रवींद्रनाथ बॅनर्जी (वय ३५, रा. सूस-पाषाण रोड, पुणे) यांनी या प्रकरणी बुधवारी (दि. ९) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचे आधार कार्ड व पॅन कार्ड नंबर प्राप्त करून त्या आधारे बनावट आधार कार्ड व पॅन कार्ड तयार केले. त्यावर अज्ञात इसमाने फिर्यादी यांचा फोटो पत्ता बदलला. आरोपीने स्वतःचा फोटो व पत्ता तेथे लावून फिर्यादीच्या नावाचा वापर केला. वेगवेगळ्या फायनान्स कंपनी कडून आठ लाख २२ हजार ६८६ रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केली.

Web Title: Fake Aadhaar and pan card fraud by taking loan of Rs 8 lakh ; Incidents in the Sus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app