लाॅजमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; मॅनेजरला अटक, दोन महिलांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 15:23 IST2023-02-05T15:23:28+5:302023-02-05T15:23:36+5:30

लॉज मॅनेजर लहू याला अटक करून ११ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला

Exposing Prostitution in Lodges; Manager arrested, two women released | लाॅजमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; मॅनेजरला अटक, दोन महिलांची सुटका

लाॅजमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; मॅनेजरला अटक, दोन महिलांची सुटका

पिंपरी : लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. निगडी परिसरातील दुर्गानगर येथे एका लॉजवर छापा मारून दोन महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. याप्रकरणी लॉज मॅनेजरला अटक केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी ही कारवाई केली.

लहू श्रीराम ऐडके (वय २८, रा. निगडी. मूळ रा. भंडारवाडी, जि. उस्मानाबाद) असे अटक केलेल्या लॉज मॅनेजरचे नाव आहे. त्याच्यासह लॉज चालक जितेश रमेश कुंदर (वय ४७, रा. निगडी), जयप्रकाश शेट्टी (वय ४०, रा. मुंबई) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस नाईक गणेश कारोटे यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गानगर येथील न्यू विसावा लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी लॉजवर शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी लॉजमध्ये दोन पीडित महिला आढळल्या. त्यांची वेश्या व्यवसायातून पोलिसांनी सुटका केली. लॉज मॅनेजर लहू याला अटक करून ११ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. लॉज चालक आणि अन्य एकाचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Exposing Prostitution in Lodges; Manager arrested, two women released