शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीत सिलेंडरमधून गळती झाल्याने स्फोट; एक गंभीर, पाच कामगार किरकोळ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 16:15 IST

- भोसरी एमआयडीसी परिसरातील घटना : महापालिकेच्या अग्निशमन दलाने आगीवर मिळवले नियंत्रण 

पिंपरी : शहरातील भोसरी एमआयडीसी परिसरातील अंबिका पावडर कोटिंग कंपनीमध्ये एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) अचानक स्फोट होऊन आग लागल्याची घटना शनिवारी (दि. २९ नोव्हेंबर) घडली होती. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, या घटनेत १ कामगार गंभीर तथा ५ कामगार किरकोळ जखमी झाले असून प्रथमोपचारानंतर पुढील वैद्यकीय उपचाराकरिता रुग्णालयात रवाना करण्यात आले.

सुनील कुमार हा गंभीर जखमी झाला असून दाऊ कुमार, सुड्ड जयस्वाल, सुरज जाटो, राहुल कुमार, रोहित कुमार हे किरकोळ जखमी झाले आहेत. शनिवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास कंपनीमध्ये अचानक मोठा स्फोट होऊन आग लागली, व स्फोटाच्या मोठ्या आवाजाने व आगीच्या उंच ज्वाला तसेच धूर पसरू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. याबाबतची माहिती परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशमन विभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्र पिंपरी, नेहरूनगर उप अग्निशमन केंद्र आणि भोसरी उप अग्निशमन केंद्र येथील पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन विभागाच्या पथकाने परिस्थितीचा आढावा घेत जलदगतीने बचावकार्य सुरू केले.

धूर आणि उष्णतेमुळे उद्भवणारा पुढील धोका लक्षात घेऊन, पथकाने सर्व जागांची पाहणी करून कंपनीतील कामगारांना सुरक्षित बाहेर काढत परिस्थिती नियंत्रणात आणली. या कार्यवाहीमध्ये उप अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले, दिलीप गायकवाड यांच्यासह ३० अग्निशामक जवान सहभागी होते. अग्निशामक पथकांनी एकत्रित समन्वयाने बचाव व अग्निशमन कार्य सुरळीतपणे पाडले. या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून अग्निशमन विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

औद्योगिक क्षेत्रातील कामकाजात सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन न करणे ही अनेक दुर्घटनांची प्रमुख कारणे आहेत. नियमित तपासणी, उपकरणांची देखरेख आणि कामगारांना दिले जाणारे सुरक्षा प्रशिक्षण हे घटक दुर्लक्षित झाले तर असे प्रकार पुन्हा घडू शकतात. त्यामुळे औद्योगिक सुरक्षेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. -विजयकुमार खरोटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

एलपीजी सारख्या उच्च धोक्याच्या साधनांशी संबंधित प्रत्येक प्रक्रियेत नियमित तपासणी, देखभाल आणि कामगारांना आवश्यक प्रशिक्षण देणे ही कंपन्यांची मूलभूत जबाबदारी आहे. या घटनेतून भविष्यातील धोक्यांबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज स्पष्टपणे जाणवते. -व्यंकटेश दुर्वास, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर आमचे पथक अत्यंत जलद प्रतिसाद देत काही क्षणातच घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात आढळलेल्या एलपी गॅस सिलेंडरमधून एलपी या ज्वलनशील गॅसची गळती मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे ‘‘व्हेपर क्लाऊड एक्सप्लोजन’’ घडले असल्याचा प्राथमिक अंदाज असून या परिसरात अधिक प्रमाणात एलपी गॅस सिलेंडर असल्याने कारखान्यातील धूर आणि उष्णतेमुळे बचावकार्य आव्हानात्मक होते, परंतु प्रत्येक कामगाराला सुरक्षित बाहेर काढणे आणि पुढील स्फोटाचे धोके टाळणे हेच आमच्या जवानांचे मुख्य ध्येय होते.  - ऋषिकांत चिपाडे, अग्निशमन अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri Company Cylinder Leak Explosion: One Seriously, Five Minorly Injured

Web Summary : A cylinder explosion at an Ambika Powder Coating company in Pimpri injured six workers. Firefighters controlled the blaze, rescuing workers. One worker is seriously injured, and five others sustained minor injuries. The cause is under investigation.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दल