पिंपरीत आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; मानसिक छळाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 04:00 PM2020-08-06T16:00:47+5:302020-08-06T16:28:26+5:30

रोटेशन नाही ,वाढीव वेतन नाही, पुरेशा सुविधांचा आरोप

Employees start agitation against administration of Aditya Birla Hospital in pimpri | पिंपरीत आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; मानसिक छळाचा आरोप

पिंपरीत आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; मानसिक छळाचा आरोप

googlenewsNext

पिंपरी : कोविड रुग्णालयात सहा तासच ड्युटी करण्याचा निर्णय आहे. पण, आम्हाला सात-सात, 12-12 तास ड्युटी करावी  लागत आहे. यामुळे ताण येत आहे. राजीनामा दिला तरी चालेल असे सांगतात. तसेच वरिष्ठ स्टाफ , बाऊन्सर्सच्या माध्यमातून सातत्याने दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशाप्रकारे प्रशासनाकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत त्याविरुद्ध आदित्य बिर्ला रुग्णालयातील आरोग्यसेविका, सेवकांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन छेडले आहे.

पिंपरी चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाबाहेर गुरुवारी( दि.६) करण्यात येत असलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग सहभागी झाला आहे. यावेळी आंदोलनकर्त्यां कर्मचाऱ्यांनी आम्हाला मिळणारे जेवण देखील निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगत ते सुद्धा वेळेवर दिले नसल्याचे सांगितले. त्यामुळे स्टाफनर्स काम करण्यासाठी इच्छूक नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

आंदोलनकर्ते कर्मचारी म्हणाले,  कोरोनात करत असलेल्या कामामुळे या महिन्यात वेतनात वाढ करण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने दिले होते. पण, वेतन वाढले नाही. स्टाफ कमी आहे. नर्स नसताना  त्यांचे कपडे हाऊसकिपिंग कर्मचा-यांना दिले जातात आणि नर्स म्हणून ते रुग्णालयात फिरतात असा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे रुग्ण, रुग्णाच्या नातेवाईकाला ते नर्स असल्याचेच वाटत होते. आम्हाला दिली जाणारी कपडे व्यवस्थित दिली जात नाही. रोटेशन व्यवस्थित नाही. वाढीव वेतन दिले नाही असेही अनेक मुद्दे आंदोलन करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केले आहे.

 

Web Title: Employees start agitation against administration of Aditya Birla Hospital in pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.