शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

पिंपरी-चिंचवडकरांचा मनोभावे सेवेने वारकऱ्यांना भावपूर्ण निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 5:38 PM

वारकरी, भाविक भक्तांच्या सेवेसाठी विठ्ठलवाडीसह शहरातील नागरिकांनी पालखी मुक्कामस्थळी भेट दिली.

ठळक मुद्देआकुर्डीतील मुक्कामानंतर पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ

पिंपरी : श्री क्षेत्र देहुतून पंढरपुरकडे प्रस्थान ठेवलेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी आगमन झाले. आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पालखी दुसऱ्या मुक्कामासाठी विसावली. शनिवारी सकाळी ६ वाजता पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. साधु-संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा या भावनेतून शहरवासीयांनी वारकरी भाविक भक्तांची सेवा केली. त्याचबरोबर पालखी सोहळयातील वारकऱ्यांना भावपूर्ण निरोप दिला. आषाढी वारीसाठी संत तुकोराम महाराज पालखीचे गुरुवारी देहूगावातून प्रस्थान झाले. शुक्रवारी सायंकाळी पालखी आकुर्डी, विठ्ठलवाडीतील विठ्ठल मदिरांत विसावली. वारकरी, भाविक भक्तांच्या सेवेसाठी विठ्ठलवाडीसह शहरातील नागरिकांनी पालखी मुक्कामस्थळी भेट दिली. मंदिर परिसरात टाळ, मृदंगाच्या निनादाने वातावरण भारावून गेले. पालखीच्या दर्शनासाठी आकुर्डीत नागरिकांची गर्दी झाली होती. पहाटेसुद्धा नागरिक दर्शनासाठी पालखी मुक्कामस्थळी हजर होते. कपाळी भगवा टिळा, खांद्यावर भगव्या पताका, मुखात हरिनामाचा गजर करणाऱ्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पहाटे ५ वाजता आकुर्डीतून पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. आकुर्डी, चिंचवड, पिंपरी  या ठिकाणी महामार्गावर दुतर्फा पालखी सोहळा पाहण्यासाठी आणि संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी अबाल वृध्दांची गर्दी झाली होती. पुणे- मुंबई महामार्गावरून पुण्याकडे हा पालखी सोहळा मार्गस्थ होणार असल्याने या मार्गावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी रस्त्याने वळविली होती. चिंचवड, पिंपरी, मोरवाडी येथे सकाळी नागरिक पालखीच्या दर्शनासाठी उभे होते. .............................वारकऱ्यांना फराळ वाटप, पाणी, दूध वाटप करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्त्यांची लगबग सकाळी खराळवाडीतील विठ्ठल रूक्मिणी मंदिरात सकाळी ९ वाजता पालखी विश्रांतीसाठी विसावली. त्यावेळी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली झाली होती. त्या ठिकाणी वारकऱ्यांना फराळ वाटप करण्यात आले. फराळ आटोपल्यानंतर साडेनऊच्या सुमारास पालखी मार्गस्थ झाली. दुपारी १२ वाजता पालखी सोहळा दापोडी येथे दुपारच्या विश्रांतीसाठी विसावला. त्या ठिकाणीही वारकऱ्यांनी भोजन केले. विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकयांसाठी प्रसादवाटप, पाणीवाटप, चहापाणी, चप्पल दुरुस्ती, दाढी-कटींग, आरोग्य तपासणी, वैद्यकीय उपचार अशा विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यात आल्या.   

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीakurdiआकुर्डी