चिंचवडमध्ये भरधाव टेम्पोच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 17:08 IST2022-12-01T17:07:00+5:302022-12-01T17:08:16+5:30
अपघातानंतर टेम्पोचालक पळून गेला...

चिंचवडमध्ये भरधाव टेम्पोच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू
पिंपरी : भरधाव टेम्पोच्या धडकेने पादचारी वृद्धाचा मृत्यू झाला. याप्रकरणी टेम्पोचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. फुलेनगर, चिंचवड येथे बुधवारी (दि. ३०) दुपारी बाराच्या सुमारास हा अपघात झाला.
सूर्यकांत जगताप (वय ७०) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा मंगेश सूर्यकांत जगताप (वय ४२, रा. रामनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील सूर्यकांत जगताप हेे फुलेनगर येथून पायी जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव टेम्पोने त्यांना धडक दिली. यात सूर्यकांत हे जखमी झाले.
अपघातानंतर टेम्पोचालक पळून गेला. सूर्यकांत जगताप यांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी पोलिसांना सांगितले.