शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रहिवाशांना हाताळता येत नसल्याने इमारतीतील यंत्रणा कुचकामी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 13:59 IST

यंत्रणा असूनही अग्निशामक दलाच्या जवानांची यंत्रणा उपलब्ध होण्याची प्रतीक्षा करण्याची वेळ रहिवाशांवर येऊ लागली आहे. 

ठळक मुद्देप्रशिक्षणाचा अभाव : अग्निशामक दलाचे जवान येईपर्यंत आगीच्या घटनांमध्ये होते नुकसानअग्निशामक यंत्रणा इमारतीत उपलब्ध करून देणे बांधकाम व्यावसायिकास कायद्याने बंधनकारकआपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेची होत नाही वेळीच तपासणी

पिंपरी : बांधकाम नियमावलीत आमूलाग्र बदल झाले आहेत. २३ मीटरपर्यंत उंचीच्या इमारतींना परवानगी मिळू लागल्याने उंचच उंच मजले ठिकठिकाणी साकारले आहेत. आगीची घटना अथवा अन्य दुर्घटना घडल्यास आपत्कालीन व्यवस्थापनाच्या उद्देशाने ही सुविधा दिली जाते. तसेच अग्निशामक यंत्रणाही सज्ज असते. अग्निशामक यंत्रणा हाताळण्याचे प्रशिक्षण नसल्याने ही यंत्रणा वापरता येत नाही, आग लागल्यानंतर उपलब्ध यंत्रणा असूनही अग्निशामक दलाच्या जवानांची यंत्रणा उपलब्ध होण्याची प्रतीक्षा करण्याची वेळ रहिवाशांवर येऊ लागली आहे. अग्निशामक यंत्रणा इमारतीत उपलब्ध करून देणे बांधकाम व्यावसायिकास कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. अग्निशामक यंत्रणा उपलब्ध करून दिली जात नाही. तोपर्यंत महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडून बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी आवश्यक असणारे ना हरकत प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे मोठ्या गृहप्रकल्पांमध्ये हमखास अग्निशामक यंत्रणा असते. ही यंत्रणा जरी सज्ज असली तरी सोसायटीतील रहिवाशांना ही यंत्रणा हताळण्याचे तसेच वापराचे पुरेसे ज्ञान नसते. त्यांच्याकडे नेमलेल्या सुरक्षारक्षकांनाही अशी अत्याधुनिक यंत्रणा वापरात आणण्यासंबंधीचे प्रशिक्षण नसते. त्यामुळे यंत्रणा उपलब्ध असूनही अग्निशामक दलाच्या जवानांनाच बोलावले जाते. उपलब्ध असलेली यंत्रणा तातडीने वापरणे शक्य होत नाही. हा प्रकार शहरात नुकत्याच घडलेल्या आगीच्या घटनांमुळे ऐरणीवर आला आहे. इमारतीतील अग्निशामक यंत्रणा सुस्थितीत आहे, की नाही याचीही तपासणी होत नाही. ............आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेची होत नाही वेळीच तपासणीउंच इमारतींना दर १२ मीटर उंचीवर रिफ्यूजी एरिया म्हणून मोकळी जागा उपलब्ध करून दिली जाते. आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दृष्टीने अलीकडच्या काळात सर्वच बांधकाम व्यावसायिक गृहप्रकल्पांमध्ये असा रिफ्यूजी एरिया उपलब्ध करून देतात. आगीची घटना घडताच त्या मजल्यांवर राहणारे रहिवासी एका ठिकाणी जमू शकतात. त्यांच्या मदतीसाठी बाहेरून आणलेली यंत्रणा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते. ..........मोठी शिडी, अथवा क्रेन रिफ्युजी एरियाजवळ नेले जाते. मदतकार्य मोहीम राबविणे शक्य असते. परंतु सर्व काही उपलब्ध असूनही वेळेत त्यांचा वापर होत नसल्याने आगीच्या घटनांमध्ये होणारे नुकसान टाळणे अद्याप शक्य झालेले नाही. .............

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfireआगHomeघर