नियंत्रण सुटल्याने कामशेत खिंडीत कंटेनर पलटी, एकजण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 12:30 IST2020-07-28T12:28:19+5:302020-07-28T12:30:27+5:30

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर दुसऱ्या लेनवर पलटी झाला.

The driver was seriously injured when the container accident in Kamshet | नियंत्रण सुटल्याने कामशेत खिंडीत कंटेनर पलटी, एकजण गंभीर जखमी

नियंत्रण सुटल्याने कामशेत खिंडीत कंटेनर पलटी, एकजण गंभीर जखमी

कामशेत : जुना मुंबई पुणे महामार्गावर कामशेत खिंडीत सकाळी एक कंटेनर उलटून अपघात झाला. यात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कामशेत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे काही काळ दोन्ही लेनवर वाहतूक कोंडी होती. मात्र कामशेत पोलिसांनी घटनास्थळी पोहचून अपघातग्रस्त वाहन बाजूला काढून लेन खुली केली.

विठ्ठल अन्नपा क्षीरसागर ( वय अंदाजे ३२, रा. सांगली ) हा कंटेनर चालक गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगळवार ( दि. २८ ) रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पुणे मुंबई लेनवर कंटेनर ( एमएच ४३ – बी जी ९४७० ) चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर दुसऱ्या लेनवर पलटी झाला. या अपघातात कंटेनर चालक हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कामशेत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने दुसऱ्या लेन वर कोणतेही नसल्याने मोठा अनर्थ टळला. अपघाताची माहिती मिळताच कामशेत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पवार, समीर शेख, हनमंत वाघमारे, संतोष शिंदे, होमगार्ड गणेश गव्हाणे यांनी घटनास्थळी जाऊन क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करीत महामार्ग वाहतुकीस खुला केला.

Web Title: The driver was seriously injured when the container accident in Kamshet