Pune Crime | खिडकीतून उघडली दरवाजाची कडी, तीन लाखांच्या दागिन्यांची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 21:25 IST2023-02-21T21:24:33+5:302023-02-21T21:25:01+5:30

पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला...

door hinge was opened through the window, jewelery worth three lakhs was stolen | Pune Crime | खिडकीतून उघडली दरवाजाची कडी, तीन लाखांच्या दागिन्यांची चोरी

Pune Crime | खिडकीतून उघडली दरवाजाची कडी, तीन लाखांच्या दागिन्यांची चोरी

पिंपरी : खिडकीवाटे दरवाजाची कडी काढून तब्बल दोन लाख ८८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. २०) थेरगाव येथील नम्रता हौसिंग सोसायटीमध्ये घडली. या प्रकरणी संदीप गजानन पांचाळ (वय ३४, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्याने खिडकीवाटे फिर्यादीच्या घराची कडी काढून दरवाजातून घरात प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटातील लाॅकर तोडून त्यामधील दोन लाख ८८ हजार रुपयांचे दागिने, लाकडी टेबलावर ठेवलेले दोन हजार रुपये किमतीचा मोबाइल तसेच पाच हजार रुपये किमतीचा माॅनिटर चोरून नेला, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: door hinge was opened through the window, jewelery worth three lakhs was stolen