पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रवासीमेट्रो सेवेला पसंती देत असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मेट्रो महत्त्वाचे आणि विश्वासार्ह साधन ठरत आहे. जलद, सुरक्षित आणि वेळेतील बचतीच्या वैशिष्ट्यांमुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी, खड्डे आणि गैरसोयींना कंटाळलेले नागरिक मेट्रोकडे वळत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या जूनमध्ये प्रवासी संख्येत ७९ टक्के आणि उत्पन्नात ८१ टक्के वाढ झाली.
विस्तार आणि नवीन मार्गिकांची जोडणी
मेट्रोच्या विस्ताराचे प्रकल्प आणि नवीन मार्गिकांची जोडणी यामुळे येत्या काळात आणखी प्रवासी मेट्रोला पसंती देतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पुणे मेट्रो आता शहराच्या शाश्वत विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ बनत आहे, असा दावा मेट्रो प्रशासन करीत आहे.
आकडे बोलतात...
महिना - प्रवासी संख्या - उत्पन्न (रुपयांत)
मे २०२४ - २६,१६,९५३ - ४,२४,७६,४८०मे २०२५ - ४७,६२,८६५ - ७,७२,७९,२५५
जून २०२४ - २९,२४,१६२ - ४,५९,६५,३८०जून २०२५ - ५२,४१,०४७ - ८,३३,५०,३७९
पुणे मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे व पिंपरी चिंचवड येथील प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची उपयोगिता, सुरक्षितता व जलद प्रवास यांचे महत्त्व लक्षात आले आहे. - डॉ. हेमंत सोनवणे, कार्यकारी संचालक, पुणे मेट्रो.