Pune Metro: नको खड्ड्यांचे दर्शन, कोंडीचा मनस्ताप अन् पावसात भिजणे; गड्यांनो, आपली मेट्रोच लय भारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 13:29 IST2025-07-11T13:24:02+5:302025-07-11T13:29:24+5:30

प्रवासी संख्येसह उत्पन्नात वाढ, जून महिन्यात ५२ लाख ४१ हजार प्रवाशांनी घेतला लाभ

Don't want to see potholes, suffer from traffic jams, and get soaked in the rain; Gosh, our metro is a great ride! | Pune Metro: नको खड्ड्यांचे दर्शन, कोंडीचा मनस्ताप अन् पावसात भिजणे; गड्यांनो, आपली मेट्रोच लय भारी!

Pune Metro: नको खड्ड्यांचे दर्शन, कोंडीचा मनस्ताप अन् पावसात भिजणे; गड्यांनो, आपली मेट्रोच लय भारी!

पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रवासीमेट्रो सेवेला पसंती देत असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मेट्रो महत्त्वाचे आणि विश्वासार्ह साधन ठरत आहे. जलद, सुरक्षित आणि वेळेतील बचतीच्या वैशिष्ट्यांमुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी, खड्डे आणि गैरसोयींना कंटाळलेले नागरिक मेट्रोकडे वळत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या जूनमध्ये प्रवासी संख्येत ७९ टक्के आणि उत्पन्नात ८१ टक्के वाढ झाली.

विस्तार आणि नवीन मार्गिकांची जोडणी

मेट्रोच्या विस्ताराचे प्रकल्प आणि नवीन मार्गिकांची जोडणी यामुळे येत्या काळात आणखी प्रवासी मेट्रोला पसंती देतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पुणे मेट्रो आता शहराच्या शाश्वत विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ बनत आहे, असा दावा मेट्रो प्रशासन करीत आहे.

आकडे बोलतात...

महिना - प्रवासी संख्या - उत्पन्न (रुपयांत)

मे २०२४ - २६,१६,९५३ - ४,२४,७६,४८०
मे २०२५ - ४७,६२,८६५ - ७,७२,७९,२५५

जून २०२४ - २९,२४,१६२ - ४,५९,६५,३८०
जून २०२५ - ५२,४१,०४७ - ८,३३,५०,३७९

पुणे मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे व पिंपरी चिंचवड येथील प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची उपयोगिता, सुरक्षितता व जलद प्रवास यांचे महत्त्व लक्षात आले आहे. - डॉ. हेमंत सोनवणे, कार्यकारी संचालक, पुणे मेट्रो.

Web Title: Don't want to see potholes, suffer from traffic jams, and get soaked in the rain; Gosh, our metro is a great ride!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.