शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी मंडईसमोरील महापालिकेच्या जागेची कागदपत्रे गायब?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 16:00 IST

भूमी व जिंदगी विभागाने नगररचना विभागाकडे मागितली माहिती

पिंपरी : पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईच्या समोरील महापालिकेचे पार्किंग, पिंपरी पोलिस चौकी आणि पिंपरी रेल्वे स्थानकाबाहेरील फळबाजार ते मुख्य बाजारपेठ रस्त्यादरम्यान असलेल्या मोकळ्या जागेची कागदपत्रेच महापालिकेकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ही जागा महापालिकेच्या मालकीची असल्याचे सांगितले जात असले, तरी संबंधित कागदपत्रे मिळत नसल्याने खळबळ उडाली आहे. या मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या माफियामार्फत येथे बेकायदा दुचाकी पार्किंग सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याचा मोठा भाग व जागा हडपल्याची तक्रार व्यापाऱ्यांकडून होत आहे.

या बेकायदा पार्किंगबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाने या जागेची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. संबंधित जागेची मालकी, आराखडे व कागदपत्रांबाबत नगररचना विभागाकडे माहिती मागविण्यात आली आहे. मात्र, त्या विभागाकडून आवश्यक सहकार्य मिळत नसल्याचे भूमी व जिंदगी विभागातील कर्मचाऱ्याने सांगितले.या जागेच्या काही भागात सध्या पोलिस चौकीही कार्यरत आहे. परिसरात फळबाजार आणि इतर व्यावसायिक दुकाने सुरू आहेत. येथे शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असल्याने या जागेला महत्त्व आले आहे. त्यामुळे जागेच्या मालकीचे व कागदपत्रांचे सत्य स्पष्ट करणे महापालिकेसाठी आवश्यक ठरत आहे. पिंपरी भाजीमंडई परिसरातील ही जागा महापालिकेचीच असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी कागदपत्रे उपलब्ध नसल्याने पुढील कारवाईत अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिका अधिकाऱ्यांना ‘मोठा वाटा’

मागील अनेक वर्षापासून या जागेवर अतिक्रमण झाले असून यातून माफिया लाखो रुपये कमावत आहे. त्यातील ‘मोठा वाटा’ प्रत्येक महिन्याला महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना मिळत असल्याचे येथील व्यापारी सांगतात. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या जागेकडे प्रशासनाकडून डोळेझाक केली जात असल्याचे सांगितले जात आहे. भूमी व जिंदगी विभागात एक अधिकारी मागील अनेक वर्षांपासून ठाण मांडून होता. त्याचेही या गोरखधंद्याला पाठबळ होते, असेही बोलले जात आहे.

पिंपरी भाजी मंडई परिसरातील जागा महापालिकेच्या मालकीची आहे. या जागेची माहिती नगररचना विभागाकडे मागितली आहे. - सीताराम बहुरे, उपायुक्त, भूमी व जिंदगी विभाग, महापालिका 

पिंपरी बाजारातील जागेबाबत भूमी व जिंदगी विभागाने मागणी केलेल्या माहितीचा शोध घेतला जाईल. त्यांना आवश्यक असलेली माहिती दिली जाईल. - संदेश खडतरे, सहसंचालक, नगररचना विभाग, महापालिका

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri Municipal Corporation Land Documents Missing Near Market?

Web Summary : Documents for Pimpri Municipal Corporation land near the market are reportedly missing, raising concerns about encroachments and illegal parking. An investigation is underway, with officials seeking information from various departments. Allegations of corruption among officials are also surfacing.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड